कर्मवीर काळे कारखान्याला केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून आर्थिक शिस्तीचे प्रशिस्तीपत्रक
Certificate of Financial Discipline from the Union Ministry of Finance to Karmaveer Kale Factory
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Sun 4July :18:30
कोपरगाव : कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याने माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली कारखाना व्यवस्थापनाने सर्व व्यवहार पारदर्शक ठेवले आहेत.ऊस उत्पादक शेतकरी, कामगार तसेच इतरही सबंधित घटकांचे सर्व देणी वेळेवर चुकती करून केंद शासनाच्या १ जुलै २०१७ च्या जीएसटी करप्रणालीप्रमाणे सर्व करांची रक्कम केंद्र शासनाला नियमितपण अदा करून सर्व रिटर्न वेळेत केल्याने केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून काळे कारखान्याला आर्थिक शिस्तीबद्दल ‘प्रशस्तीपत्रक’ मिळाल्याची माहिती कार्यकारी संचालक गिरीश जगताप यांनी दिली आहे.
अतिशय बिकट अशा परिस्थितीमध्ये आ. आशुतोष काळे यांच्या खांद्यावर कर्मवीर काळे कारखान्याची जबाबदारी आली. ऊस उत्पादक शेतकरी, कामगार यांचे नेहमीच हित जोपासनाऱ्या कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या आदर्श विचारांवर कारखान्याचा अत्यंत जबाबदारीने कारभार करून त्यांनी आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर तीनच वर्षात कारखाना तोटामुक्त करून दाखविला आहे. कारखान्याला संचित नफा मिळवून देत कारखाना व उद्योग समूह प्रगतीच्या शिखराकडे वाटचाल करीत असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पूर्ण देणी देवून कामगारांचे मासिक वेतन देखील नियमितपणे सुरु आहे.तसेच राज्य व केंद्र शासनाची देणी देखील मुदतीच्या आत दिली आहे. १ जुलै २०१७ पासून आर्थिक वर्ष २०२१ पर्यंतची या जीएसटीची सर्व देय रक्कम विहित नमुन्यात वेळेत भरून आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे. या आर्थिक शिस्तीची दखल घेवून केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सी.बी.आय.सी.चे अध्यक्ष एम. अजितकुमार यांनी प्रशस्तीपत्र देवून कारखान्याच्या आर्थिक नियोजनाचे कौतुक केले आहे. कर्मवीर काळे कारखान्याच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाचे यापूर्वी देखील अनेक राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार व प्रमाणपत्र मिळाले आहेत. त्यामध्ये या प्रशस्तीपत्रकाची भर पडली आहे. त्याबद्ल कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक माजी आमदार आशोकराव काळे व चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी सर्व ऊस उत्पादक शेतकरी, संचालक मंडळ, व्यस्थापन,कामगार यांचे अभिनंदन केले आहे.





