सर्प मित्राने दिलं ४ सापाना जीवनदान; केली सुखरुपपणे सुटका

सर्प मित्राने दिलं ४ सापाना जीवनदान; केली सुखरुपपणे सुटका

Snake friend gave life to 4 snakes; Kelly escaped safely

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Tue 6July :17:20

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील कोपळपेवाडी येथे एका सर्प मित्राने एका दिवसात ३ कोब्रा व एक धामण यांना दिले जीवनदान दिले आहे. शिवा भोंगळ हा तरूण सर्पमित्र आहे. परिसरात कुठेही साप आढळल्यास तो नक्कीच साप आणि नागरिकांची मदत करतो. तालुक्यातील कोळपेवाडी येथे वेगवेगळ्या नागरिकाच्या घरी ३ नाग व एक धामण आढळले होते. भोगंळ यांनी या ३ नागांना व एक धामण यांना पकडून सुखरुपपणे त्याची सुटका केल्याने त्याच्या धाडसाचे पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक होत आहे.

शनिवारी सकाळी माहेगाव येथील बाळासाहेब भगूरे यांच्या द्राक्ष बागेत जमिनीखाली बिळातील पाच फूट लांबीच्या कोब्राला तीन तासाच्या अथक प्रयत्ना नंतर बरणीत बंदिस्त केले सायंकाळी कर्मवीर शंकरराव काळे कारखाना आसवांनीत चार फूट नागास पकडले कार्यकारी संचालक यांच्या निवासस्थानी एका विषारी नागास सुरक्षित पकडले व बंगल्या पाठीमागे बिन विषारी धामण पकडली, पकडण्यात आली एकाच दिवशी चार सापास शिवा भोंगळ यांनी पकडले

अपेक्षित पाऊस न झाल्याने उकाडयामुळे बिळातील साप बाहेर येत आहेत. शेतकऱ्यांनी रात्री च्या बॅटरी काठी व पायात गम बूट घालूनच शेतात जावे सर्प दंश झाल्यास घाबरून न जाता रुग्णास तात्काळ हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यास जीव जाण्याचा धोका कमी संभावेल शासनाने सर्व सापास सनुसूची मध्ये समाविष्ट केल्याने साप मारणे दखल पात्र गुन्हा समजण्यात येईल अशे आदेश दिले आहे वन्य प्राणी यांच्या हल्ल्यात जखमी अथवा मृत झाल्यास मिळणारी भरपाई व उपचार शासनाने साप चावलेल्या व्यक्तीस मोफत सर्व हॉस्पिटलमध्ये सुविधा उपलब्ध करावी यासाठी शासन दरबारी पाठ पुरावा करणार असल्याचे भोंगळ यांनी सांगितले पावसाळ्यात महाराष्ट्र राज्यात साप चावून मरणारांंची संख्या मोठी असते.

Leave a Reply

You cannot copy content of this page