हुंड्यासाठी विवाहितेचा बळी, चारजणांना  १२ जुलैपर्यंत पोलिस कोठडी 

हुंड्यासाठी विवाहितेचा बळी, चारजणांना  १२ जुलैपर्यंत पोलिस कोठडी 

Marriage victim for dowry, four remanded in police custody till July 12

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Fir 9July 15:20

कोपरगाव : माहेरून हुंडयाचे ५० हजार रुपये रोकड आणावी यासाठी एका विवाहितेला असह्य त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले.
कोपरगाव तालुक्यातील धारणगावमध्ये गुरुवारी ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी मृत विवाहितेच्या नवऱ्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. न्यायालयाने या चौघांना सोमवार  १२ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे अशी माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली आहे.

राणी किरण चंदनशिव (वय १९) असे मृत विवाहितेचे नाव आहे. ती धारणगाव  राहत होती.  वडीलांनी लग्नात पन्नास हजाराचा हुंडा दिला  नाही तसेच लग्न चांगले केले नाही  म्हणून राणीला तिचा नवरा, सासरा,सासू व दिर  माहेरून ५० हजार   रुपये आणावे यासाठी त्रस्त करीत होते.  राणी पैसे आणण्यास नकार देत होती. त्यामुळे आरोपी तिचा शारीरिक तसेच मानसिक छळ करीत होते. हा छळ असह्य झाल्यामुळे ती आजारी पडली, गुरुवारी (८जुलै) दुपारी १२ वाजता गोदावरी नदी पात्रात संशयास्पद मृत्यू झाला आहे.  तिचा हुंड्यासाठी बळी घेतला  वगैरे  मजकुराच्या फिर्यादीवरून  तिचा नवरा किरण साहेबराव चंदनशिव ,  सासरा साहेबराव जगन्नाथ चंदनशिव, सासू विठाबाई उर्फ मंदा साहेबराव चंदनशिव,  तसेच  लक्ष्मण साहेबराव चंदनशिव  नामक दीर कारणीभूत असल्याची तक्रार  दत्तात्रय तुकाराम साठे (वय ४५, रा. मढी बुद्रुक ता. कोपरगाव , ) यांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये नोंदवली. त्यावरून पोलिसांनी  उपरोक्त चौघांविरुद्ध गुरुवारी(८जुलै) रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. शुक्रवारी (९जूलै)  रोजी सकाळी वरील चारही आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर केले असता ,न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे . याप्रकरणी पुढील तपास  उपविभागीय पोलिस अधिकारी शिर्डी संजय सातव  यांच्या मार्गदर्शनाखाली  तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हे स्वतः करीत आहेत. 

Leave a Reply

You cannot copy content of this page