पोहेगावातील अवैध धंदे पंधरा दिवसात बंद करा अन्यथा उपोषण 

पोहेगावातील अवैध धंदे पंधरा दिवसात बंद करा अन्यथा उपोषण

Shut down illegal trades in Pohegaon within fortnight otherwise fast

सरपंच अमोल औताडे यांचा शिर्डी पोलीसांना इशारा Sarpanch Amol Autade warns Shirdi police

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Fir 9July 16:30

 कोपरगाव :  कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे  सुरू असलेले बेकायदा दारू विक्री मटका, जुगार,   यासारखे अवैध धंदे बंद करून येथील  पोलीस औट पोस्ट  कायमस्वरूपी  (२०जुलै) पंधरा दिवसाच्या आत सुरु करण्यात यावे अन्यथा सोमवारी २६  जुलै पासून   उपोषणाला बसणार, असा इशारा  पोहेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच  अमोल औताडे यांनी दिला आहे.

याबाबतचे निवेदन त्यांनी शिर्डी पोलिस कार्यालयाला पाठवले असून माहितीसाठी खासदार सदाशिव लोखंडे व उपविभागीय पोलिस अधिकारी शिर्डी यांना  दिले आहे.

शिर्डी पोलीस निरीक्षक  यांना केलेल्या दिलेल्या निवेदनात  पोहेगावातील  सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात बेकायदा दारू विक्री व अवैध धंदे सुरू आहेत. एकीकडे कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य जनता अडचणीत असतांना त्यांच्यावर विविध निर्बंध लादले जात आहेत. मात्र, अवैध धंदे खुलेआम सुरु आहेत. शिवाय याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते.त्यामुळे कोरोना पसरणार नाही का ? तसेच त्यांना पोलिस अधिकाऱ्यांचे अभय आहे का ? असा सवालही उपस्थित केला आहे. घरफोड्या व चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. येथील पोलीस औट पोस्ट बंद असल्याने गुन्हेगारांना धाक राहिला नाही   १० हजार  लोकसंख्या असलेल्या पोहेगाव सारख्या गावाचा परिसरातील १० ते २५ गावांशी  दैनंदिन व्यापार  असून अशा शांत सुसंस्कृत गावात असे प्रकार अशोभनीय आहेत. त्यामुळे शिर्डी पोलिस निरीक्षक यांनी याची तत्काळ दखल घ्यावी व हे बेकायदा दारू विक्री व अवैध धंदे त्वरीत बंद करून कायमस्वरूपी पोलीस औट पोस्ट सुरू करावे  अन्यथा आपण स्वत:  सरपंच अमोल औताडे  व उपसरपंच  प्रशांत रोहमारे यांच्यासह उपोषणास बसणार आहे. होणाऱ्या परिणामाची जबाबदारी आपणावर राहील असेही सरपंच औताडे यांनी निवेदनात स्पष्ट म्हटले आहे. 

Leave a Reply

You cannot copy content of this page