तिसरी लाटेत बालकांच्या सुरक्षेसाठी आधी पालकांचे लसीकरण करावे – विवेक कोल्हे

तिसरी लाटेत बालकांच्या सुरक्षेसाठी आधी पालकांचे लसीकरण करावे – विवेक कोल्हे

In the third wave, parents should be vaccinated first for the safety of the child – Vivek Kolhe

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Fir 9July 18:30

 कोपरगाव : “आगामी काळात लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वय वर्षे ३ ते १० वयोगटातील बालकांच्या पालकांना प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे, असे आवाहन कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी शिंगणापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोना लसीकरण कॅम्पमधील अधिकारी,डॉक्टर यांना केले.ज्यामुळे पालक आणि त्यांचे बालक सुरक्षित राहण्यास अधिक मदत होईल असेही ते म्हणाले,

विवेक कोल्हे म्हणाले, महाराष्ट्रात २ ते ३ आठवडय़ांच्या आत कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज आहे. ती रोखण्यासाठी जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करावे लागेल.लोकांनी कोविड गाइडलाइन्सचे पालन करावे लागेल.अशा परिसरांचे मॉनिटरिंग करावे लागेल, जेथे कोरोनाची प्रकरणे झपाटय़ाने वाढत आहेत.जेथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ५ टक्यांपेक्षा जास्त आहे, तेथे कंटेनमेंट क्षेत्र घोषित करावे लागेल. या शासनाने व आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे आपल्याला सर्वांना पालन करावे लागेल.  कोपरगाव शहर व तालुक्यात कोरोनाचा कहर कमी झाला असून दिलासादायक बाब म्हणजे आज रिकव्हरी रेट ९७.३९ टक्क्यांवर पोहचला आहे. राज्यात अनेक जिह्यात अनलॉक करण्यात आले आहे. या प्रसंगी शिंगणापूरचे सरपंच भीमा संवत्सरकर, सौ.पूनम तुळसकर, पोलीस पाटील सौ.सविता आढाव, दत्तात्रय संवत्सरकर, रामदास संवत्सरकर, श्रीकांत संवत्सरकर,संदिप कुर्हे, डॉ.कृष्णाजी पवार आदी.उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page