ओेबींसीसाठीचे पुर्वीचे आरक्षण कायम ठेवावे-पांढरे
Maintain previous reservation for OBC-Pandhare
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Sat 10July 16:00
कोपरगांव : ओबींसी समाजासाठीचे आरक्षण कायम ठेवावे त्यासाठी स्वतंत्र जनगणनेची आवश्यकता नसून के. कृपणमुर्त्ती यांनी दिलेल्या आदेशात परिच्छेद क्रमांक ४८ मध्ये कन्क्लुजन ३ मध्ये इम्पिरिकल डाटा सादर करणे हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचे म्हटले असुन त्याप्रमाणे हे आरक्षण कायम ठेवावे अशा आशयाचे निवेदन माळी बोर्डींगचे अध्यक्ष अनिल बबनराव पांढरे यांच्यासह सर्व ओबीसी समाजाच्या अध्यक्ष बांधवांनी तहसिलदार योगेश चंद्रे यांना दिले असुन शासनांने त्याबाबत पाठपुरावा करून ओबीसी समाजावर झालेला अन्याय दुर करावा असेही ते म्हणांले.

याप्रसंगी रविंद्र पाठक (ओतारी समाज), प्रभाकर शिंदे (धनगर समाज), मच्छिंद्र केकाण (वंजारी समाज), अशोक लकारे, राजेंद्र गंगुले (कहार समाज), मंुकूंद काळे), अशोक माळवदे, शेखर बॊरावके, डाॅ मनोज भुजबळ (सावता माळी युवक संघ), किरण सुपेकर (वासुदेव जोशी समाज), संतोश वढणे, विशाल राउत (समता परिषद), प्रदिप नवले (महात्मा फुले मंडळ), वैभव गिरमे, नगरसेवक शिवाजी खांडेकर, विजय ओढणे, राहुल आघाडे (धोबी समाजासह), सर्व समाजाचे अध्यक्ष व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते त्यांच्या निवेदनावर स्वाक्ष-या आहेत.
अनिल पांढरे पुढे म्हणांले की, प्रत्येक सामाजिक कार्यात ओबीसी समाजाचे योगदान मोठे आहे., त्यांच्यावर अशा प्रकारे वार करून त्यांचे आरक्षण काढुन घेतले तर स्थानिक स्वराज्य संस्थासह अन्य ठिकाणी या समाजाची मोठी गळचेपी होईल परिणामी सामाजिक शान्तता धोक्यात येवुन नाईलाजास्तव ओबीसी समाजाला आरक्षणासाठी मोठे आंदोलन उभे करावे लागेल. ओबीसी समाजाच्या भावना लक्षात घेवुन शासनांने यावर मध्यस्थ म्हणून तोडगा काढावा व वर्षेनुवषे सुरू असलेले आरक्षण कायम ठेवावे असे ओबीसी समाजाच्या सर्व अध्यक्षांनी स्पष्ट केले.





