सामाजिक बांधिलकीचा भावनेतून समाजकार्य आपोआप घडते-पद्मश्री पोपटराव पवार

सामाजिक बांधिलकीचा भावनेतून समाजकार्य आपोआप घडते-पद्मश्री पोपटराव पवार

Social work happens automatically out of a sense of social commitment – Padma Shri Popatrao Pawar

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Sat 10July 16:15

 कोपरगाव :माणसाला आध्यात्मिक संस्कारातून समाजाची ओढ लागली की त्याच्या हातून विधायक काम घडून जाते. समाजामध्ये काम करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते परंतु तरीही मागे न राहता  पुढे चालत राहिले, तर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपल्या हातून समाजकार्य आपोआप घडते.” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी येथे व्यक्त केले.

ते के जे सोमैया महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व वृक्षवेध फाऊंडेशन यांच्यावतीने दत्तक गाव अंजनापूर ता कोपरगाव येथे आयोजित वृक्षारोपण व कृतज्ञता कोनशिलेचे अनावरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी को ता एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष मा.अशोकराव रोहमारे हे होते.                 

याप्रसंगी शिर्डीचे उपविभागीय पोलिस अधीक्षक मा. संजय सातव, स्नेहालय परिवार अहमदनगर चे संस्थापक गिरीश कुलकर्णी संदीप रोहमारे, प्राचार्य डॉ बी एस यादव, प्रा. एन . जी. बारे वृक्षवेध फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गव्हाणे, सर्व सदस्यआदी मान्यवर उपस्तिथ होते. या प्रसंगी  रा से यो चे जिल्हा समन्वयक डॉ. शैलेंद्र बनसोडे, कार्यक्रम अधिकारी डॉ बी एस गायकवाड, डॉ.एस.एम.देवरे प्रा नागरे, डॉ. सुरेखा भिंगारदिवे  आदी आयोजक म्हणून उपस्थित होते.                 अध्यक्षस्थानावरून बोलताना मा.अशोकराव रोहमारे म्हणाले की, “अंजनापूर हे गाव पर्यावरण रक्षणासाठी पुढे आले ही अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळेच हे गाव आमच्या महाविद्यालयाने दत्तक घेतले आणि आमच्या राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक या गावात सातत्याने वृक्षारोपण व वृक्ष-संवर्धनाचे काम करीत आहेत. महाविद्यालय रा से यो च्या माध्यमातून वृक्षवेध फाऊंडेशनला सर्वतोपरी सहकार्य करण्यास सदैव तयार आहे.”                

यावेळी संजय सातव आपल्या मनोगतात म्हणाले की, “अंजनापूर गावात कुठल्याही प्रकारचा एफ आय आर दाखल झालेला नाही. आज एका विधायक कार्यक्रमासाठी मला यायला मिळाले ही अभिमानाची बाब आहे. दोन वर्षांनी माझी सेवा पूर्ण होईल.त्यानंतर मला ही माझ्या गावासाठी या पद्धतीचे काम करण्याची इच्छा आहे. या गावाकडून हीच प्रेरणा घेऊन मी जात आहे.” स्नेहालय परिवार अहमदनगर चे संस्थापक मा.गिरीश कुलकर्णी म्हणाले की “के जे सोमैया महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अंजनापूर गावात वृक्षारोपण व वृक्ष-संवर्धनाच्या माध्यमातून जे काम होते आहे ते नक्कीच कौतुकास्पद आहे. रुबी कन्स्ट्रकशन चे संचालक मा. संदीप गाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.   

Leave a Reply

You cannot copy content of this page