कंटेनरची ट्रॅक्टरला धडक; तरुण जागीच ठार

कंटेनरची ट्रॅक्टरला धडक; तरुण जागीच ठार

The container hit the tractor; The young man died on the spot

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Sat 10July 20:55

कोपरगाव : भरधाव कंटेनरने ट्रॅक्टरला धडक दिल्याने ३० वर्षीय तरुण जागीच ठार झाला. नगर मुरबाड महामार्गावर जनार्दन स्वामी मंदिराच्या पाठीमागे पुणतांबा बेट नाका दरम्यान शनिवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शंकर खंडेराव लोहकणे (३०) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मृत शंकर खंडेराव लोहकणे(३०) हे कारवाडी कोकणठाण ता. कोपरगाव येथून पुणतांबा फाटाकडुन कोपरगाव कडे नगर-मनमाड महामार्गावरून ट्रॅक्टर क्रमांक एम. एच. १५ डी. यू. १११० वरून शनिवारी (१०जुलै) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास जात असताना त्यांच्या ट्रॅक्टरला पाठीमागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने ( आरजे. ०६ जी.सी. ४६२१) जबर धडक दिली. मागून धडक बसल्याने ट्रॅक्टर खड्ड्यात कोसळल्याने मागील चाके तुटून निखळली. यात शंकर लोहकणे याचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात मयताचा चुलत भाऊ गोकुळ आप्पासाहेब लोहकणे यांच्या तक्रारीवरून कंटेनर चालकांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास स. फौ. एस. पी. पवार हे करीत आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page