नगरपालिका निवडणूकीत राष्ट्रवादीला बहुमत द्या – आ. आशुतोष काळे
Give majority to NCP in municipal elections – MLA Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Mon 12July 18:20
कोपरगाव : मागील साडेचार वर्षात विरोधकांनी कोपरगाव शहराच्या विकासात आडकाठी घातली आहे. त्यात आता विधानसभेतील पराभव विसरता येत नसल्यामुळे विरोधकांनी शहरातील महत्वाच्या २८ कामांना सभागृहात बहुमताच्या बळावर विरोध केला. जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करून आणली. तर विरोधकांनी न्यायालयातून स्थगिती आणली, हे शहर विकासासाठी घातक असून येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसला बहुमत मिळवून द्या, असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित पदाधिकारी पदवितरण प्रसंगी केले.

आ. आशुतोष काळे पुढे म्हणाले की, कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न सुटू नये, ५ नंबर साठवण तलाव होऊ नये यासाठी विरोधकांनी पडद्यामाघून खोडा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र पाच नंबर साठवण तलावाचे काम व्हावे यासाठी मी केलेल्या धरणे आंदोलनाच्या वेळी संपूर्ण कोपरगाव शहरातील जनता माझ्यासोबत होती. मी करीत असलेला संघर्ष व माझे प्रयत्न प्रामाणिक होते याची शहरातील जनतेला खात्री पटल्यामुळे त्यांनी मला विधानसभा निवडणुकीत भरभरून मताधिक्य दिले. त्यातून उतराई होण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कोपरगाव शहरासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे व यापुढे देखील आणणार आहे. कोपरगाव शहराचा सर्वांगीण विकास व्हावा हि माझी तळमळ आहे. भविष्यात कोपरगाव शहराच्या विकासात अशा अडचणी निर्माण होणार नाहीत. त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला एकहाती सत्ता महत्वाची आहे. आपण करीत असलेले काम जनतेला भावले आहे. त्यामुळे शहरातील जनता विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती केल्याशिवाय राहणार नाही याचा मला विश्वास असून कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कामाला लागावे असे आ. काळे यांनी पदाधिकाऱ्यांना सूचित केले.
शहराध्यक्ष सुनील गंगूले, हाजी मेहमूद सय्यद, रमेश गवळी, अशोक आव्हाटे, बाळासाहेब रुईकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी धरमशेठ बागरेचा, शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, हाजी मेहमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, कार्याध्यक्ष संदीप कपिले, वाल्मिक लहिरे, निखील डांगे, फकीरमामु कुरेशी, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश गवळी, डॉक्टर सेलचे अध्यक्ष तुषार गलांडे, रावसाहेब साठे, प्रकाश दुशिंग, कृष्णा आढाव, मनोज कडू, सुनील बोरा, बाळासाहेब रुईकर, प्रा.अंबादास वडांगळे, चंद्रशेखर म्हस्के, सचिन परदेशी, राहुल देवळालीकर, संतोष शेलार, विजय त्रिभुवन, राजेंद्र फुलपगार आदींसह सर्व सेलचे अध्यक्ष, पक्षाचे पदाधिकारी, नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी (विद्यार्थी शहराध्यक्ष) कार्तिक सरदार, (सांस्कृतिक तालुकाध्यक्ष) रमेश टोरपे, (उपाध्यक्ष) किशोर डोखे, अमोल गिरमे, राकेश शहा, विलास आव्हाड, शकील खाटिक, (सरचिटणीस) किरण बागुल, दिलीप पोटे, राजू उशिरे, रविंद्र सोनटक्के, शंकर घोडेराव, भाऊसाहेब लोहकरे, (संघटक) विजय बागडे, विलास ताम्हाणे, रुपेश वाघचौरे, अमोल आढाव, मुन्ना पठाण, जनार्दन शिंदे, रविंद्र चिंचपूरे, राजू ठाकरे, शिवाजी कुऱ्हाडे, राजेंद्र वालझाडे, अल्ताफ पठाण, आक्रम शेख, अनिल परदेशी, कैलास महालकर, (चिटणीस) राजेंद्र राऊत, अशोक सोळसे, शकूर शेख आदी पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आ. आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव शहरातील घराघरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार पोहचवून शहर विकासासाठी आ आशुतोष काळे यांचे हात बळकट करण्याचा निर्धार केला.





