मराठी सिनेअभिनेत्यांच्या हस्ते वारी येथे वृक्षारोपण
Tree planting at Wari by Marathi film actors
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Tue 13July 10:00
कोपरगाव :तालुक्यातील वारी येथे सोमवारी (१२ जुलै ) रोजी मराठी सिनेअभिनेते चिन्मय उदगीरकर व मराठी सिनेअभिनेत्री मयुरी कापडने यांच्या हस्ते वड, पिंपळ, चिंच व कडूलिंब या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
येथील राहुल दादा टेके पाटील चेरिटेबल ट्रस्ट व गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांच्या विशेष सहकार्यातून हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी गोदावरी दुध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, पो. नि. दौलतराव जाधव, पं. स. सदस्य मधुकर टेके, कामगार नेत्या वंदना पवार, माजी सभापती मच्छिंद्र टेके, मुख्याध्यापक मंजुषा सुरवसे, सौमैंया उद्योग समूहाचे संचालक सुहास गोडगे, उपमहाव्यवस्थापक बी. एम. पालवे, बी. पी. पाटील, वरिष्ठ कामगार अधिकारी संजय कराळे, मधुकरराव टेके, विशाल आढाव, संजय टेके, विशाखा निळे, मच्छिंद्र टेके महाराज, उपसरपंच मनीषा गोर्डे, सदस्या रोहिणी निळे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
शिबिर यशस्वीतेसाठी मधुकर सोनवणे, विजय निळे, बापू वाकचौरे, अशोक निळे, सुरज बोर्डे, रघुनाथ आहेर, मच्छिंद्र मोरे, भास्कर बोर्डे, सचिन मोकळ, आप्पासाहेब थोरमीसे, सचिन मैंद, अजीम शेख, चंद्रकांत पाटील, दौलत वाईकर, मच्छिंद्र मुरार, प्रा. रविंद्र जाधव, रोहित टेके, सुरज टेके, प्रथमेश टेके, स्वप्नील टेके, बिपिन टेके, पुरुषोत्तम टेके, साईराज टेके, अनुराग टेके यांच्यासह मित्रपरिवाराने विशेष परिश्रम घेतले.





