कोपरगावात पान शौकिनांसाठी साठी ‘केसरी तारा पान ’ खुले; ३५० व्हरायटी
‘Kesari Tara Paan’ open for home fans in Kopargaon; 350 varieties
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Tue 13July 16:20
कोपरगाव : एके काळी गुळाची बाजारपेठ कोपरगावला पान शौकिनांचा वारसा लाभला आहे. केसरी तारा पानचे आकर्षण आहे. बऱ्याच वर्षानंतर कोपरगाव करांसाठी पानाचे हे नवे दालन खुले झाले आहे. आता शिर्डीला येणाऱ्या भाविकांनीही दर्जेदार पानाचा स्वाद मिळणार आहे. असे सांगून संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी उद्घाटन झाल्याचे सांगून शुभेच्छा दिल्या,
येथील कैलास जाधव यांचे चिरंजीव समीर जाधव या तरुणाने हिंदुरुदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारासमोरील नगरपालिकेच्या गाळ्यात उभारणी केली आहे. दहा रुपयांपासून पाचहजार रुपये पर्यंत विविध ३५० प्रकारची पाने ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती जाधव यांनी दिली.
यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, शिवसेना चे उत्तर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, रिक्षा संघटना अध्यक्ष कैलास जाधव, रिक्षा पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र सालकर, उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे,गटनेते रवींद्र पाठक, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले, टॅक्सी सेना अध्यक्ष अस्लम शेख, एसटी कामगार अध्यक्ष भरत मोरे, सागर जाधव,माजी नगरसेवक बबलू वाणी, विनोद राक्षे, वैभव गिरमे, संदीप देवकर , सुनील पांडे, जितेंद्र सारडा, पिंकी चोपडा, बाळासाहेब राऊत, अविनाश पाठक, वैभव आढाव, महेश गोसावी आदींसह मान्यवर व मित्रपरिवार उपस्थित होते.