युवकांमधील सुप्त नेर्तृत्वगुणांना वेळीच ओळखा – रवि अनासपुरे
Recognize the latent leadership qualities in the youth in time – Ravi Anaspure
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Wed 14July 19:00
कोपरगाव: भारतीय जनता पक्ष आणि त्याचे नेर्तृत्व सर्वसामान्यांची आईप्रमाणे काळजी घेणांरे असुन पक्ष संघटनातुन बूथ मजबुत करा यश आपल्याच हातात असुन युवकांमध्ये असणां-या सुप्त नेर्तृत्वगुणांना वेळीच ओळखा असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र भाजपचे विभागीय संघटन मंत्री रवि अनासपुरे यांनी केले.
अहमदनगर उत्तर नगर जिल्हा व तालुकास्तरीय समर्थ बुथ अभियान आढावा बैठक बुधवारी कोपरगांव येथे बुधवारी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या अध्यक्षतेखालील उत्तर नगर जिल्हा व तालुकास्तरीय समर्थ बुथ अभियान आढावा बैठकीत संयोजक, शक्ती केंद्रप्रमुख, बुथप्रमुख, सर्व आघाडयांचे पदाधिकारी आदिंना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात वर्षात देशाच्या सुरक्षाव्यवस्थेत केलेल्या प्रगतीचा आढावा खासदार डाॅ सुभाष भामरे यांनी व्हर्चुअल पध्दतींने कार्यकर्त्याना दिला . प्रारंभी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस नितीन दिनकर, जिल्हा संयोजक सुनिल वाणी, जिल्हा महिलाध्यक्षा सोनल नाईकवाडे, जिल्हा युवक अध्यक्ष श्रीराम डेरे, जिल्हा किसान आघाडीचे सतिश कानवडे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार, जालिंदर वाकचौरे, नितीन कापसे, सत्येन मुंदडा, डाॅ इथापे आदिंचा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, युवानेते विवेक कोल्हे, विधीज्ञ रविंद्र बोरावके, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष डी आर काले, भाजपा युवा मोर्चाचे अविनाश पाठक, कैलास खैरे, सुनिल देवकर आदिंच्या हस्ते सत्कार करण्यांत आला. तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी कोपरगांव विधानसभा मतदार संघ बुथ अहवाल सादर केला. उत्तर नगर जिल्हयातील १६६४ बुथ,३१९ शक्ती केंद्र व प्रभारी शक्ती केंद्राचा आढावा जिल्हा संयोजक सुनिल वाणी दिला. स्नेहलता कोल्हे म्हणांल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नडडा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदि राष्ट्रीय व राज्य पक्षीय नेर्तृत्वांने जनसामान्यांच्या प्रत्येक अडचणींत लक्ष देवुन त्याच्या सोडवणुकीसाठी सातत्यांने प्रयत्न केले आहेत. १३० कोटी लोकसंख्येचे कुटूंब मानुन भाजपाने त्यांच्या प्रत्येक सुखःदुःखात साथ दिली आहे. शेवटच्या घटकापर्यंत विकासाची परिभाषा नेण्यांसाठी कावळयांपेक्षा मावळेच महत्वाचे असतात आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी बुथ प्रमुखांवर असुन त्यांनी आजपासुनच जे काही केलं ते सत्य जनतेपर्यंत पोहोचविण्यांच्या कामाला लागावे. विरोधक सत्ता आणि खुर्चीसाठी एकत्र होवुन आपल्याविषयी जनसामान्यांमध्ये बुध्दीभेद करीत आहेत, तर दुसरीकडे स्वबळाची भाषा वापरत आहेत त्यांचा हा कावेबाजपणां वेळीच ओळखा. कोपरगांव विधानसभा मतदार संघात विकासकामांचा डोंगर उभा केला असुन सत्ताधारी त्याचीच उद्घाटने करून नारळ फोडीत आहे. रवि अनासपुरे पुढे म्हणांले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी शासनांने मन की बात मधुन बुथ आढावा घेत भारतीय जनता पक्षाचे नेर्तृत्व बळकट करण्यांसाठी सातत्यांने मार्गदर्शन देत आहेत. नेते कृतीतुन आदर्श निर्माण करत असतात, गावातल्या नागरिकांना बदलविण्यांची ताकद बुथ संपर्कामध्ये असते. पक्षांने तसेच स्थानिक नेर्तृत्वांने केलेले काम त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यांचा विडा उचलुन भारतीय जनता पक्षाचे संघटन मजबुत करावे. शेवटी शहराध्यक्ष डी आर काले यांनी आभार मानले. दिपक चौधरी यांनी सुत्रसंचलन केले.





