खरीप पिक विमा भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी- स्नेहलता कोल्हे

खरीप पिक विमा भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी- स्नेहलता कोल्हे

Get extension for kharif crop insurance-  Snehalta Kolhe

 कोपरगाव : चालू वर्षी मान्सून उशीरा आल्यामुळे शेतकऱ्यांच्या खरिपाच्या  पेरण्यांना वेळ लागला, त्यामुळे त्यांना मुदतीत पिक विमा भरता आला नाही शासनाने खरीप पिक विमा भरण्यासाठी मुदत वाढवून द्यावी अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव सौ.  स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.

सौ. स्नेहलता कोल्हे  यांनी  आपल्या निवेदनात म्हटले आहे की, यंदा पर्जन्यमान उशीरां झाले सुरवातीला मृग नक्षत्राचा पाऊस जेमतेम झाला त्यात अनेक शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली मात्र त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने अनेक शेतकऱ्यांवर  दुबार पेरणीचे संकट आले, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडून पडले.  त्यात खरीप पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 15 जुलै आहे.  या मुदतीत शेतकऱ्यांना रक्कम भरता आलेकी नाही, तेव्हा शासनाने खरीप पिक विमा भरण्यासाठी मुदत वाढवून द्यावी जेणेकरून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल असेही सौ स्नेहलता कोल्हे यांनी  म्हटले आहे.

 

Leave a Reply

You cannot copy content of this page