परीश्रम करणाऱ्याला यश हमखास मिळते- दौलतराव जाधव

परीश्रम करणाऱ्याला यश हमखास मिळते- दौलतराव जाधव

He who works hard gets success – Daulatrao Jadhav

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Thu 15July 15:00

कोपरगांव: ग्रामिण भागातील मुलांमध्ये शारीरिक व बौध्दिक संपत्तीला योग्य आकार देण्याचे काम संजीवनीच्या प्रि कॅडेट सेंटर मधुन केले जाते म्हणून ते यशस्वी होतात हे अनेकदा सिध्द झालेले आहे. तेंव्हा स्वतःबरोबरच समाज व देशाच्या प्रगतीसाठी परीश्रम करणाऱ्याला यश हमखास मिळते, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी संजीवनी प्रि कॅडेट ट्रेनिंग सेंटरच्या ८६ व्या तुकडीस मार्गदर्शन करताना व्यक्त केले. पोलीस विभागात अनेक जागा निघणार आहे, तेव्हा येणाऱ्या संधींचे सोने करा, असे ही ते म्हणाले, अध्यक्षस्थानी विश्वस्त सुमित कोल्हे होते.

यावेळी सेंटरचे वरिष्ठ अधिकारी अशोक थोरात उपस्थित होते. सुमित कोल्हे म्हणाले की, ग्रामिण भागातील कुटूंबे सक्षम होतील, या विचार धारेतुन माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी १५ सप्टेंबर, १९९२ रोजी संजीवनी प्रि कॅडेट ट्रेनिंग सेंटरची स्थापना केली. त्यांनी सुरू केलेले कार्य कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे नेटाने पुढे घेवुन जात ग्रामिण भागातील कुटूंबाना सक्षम करीत आहेत. आज पर्यंत येथुन सुमारे ३००० नवयुवकांना वेगवेगळ्या क्षेत्रात नोकऱ्या मिळाल्या. विशेषतः सैन्यदलात मोठ्या संख्येने नवयुवक सामिल झाले आणि त्यांनी देश सेवेसाठी वाहुन घेतले. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी नुकतेच ५२०० पोलीसांची भरती या डिसेंबर २१ अखेर करण्यात येणार आहे, असे सुतोवाच केले आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी ग्रामिण भागातील नवयुवकांनी संजीवनी प्रि कॅडेट सेंटरशी संपर्क साधुन तीन महिण्यांचे प्रशिक्षण पुर्ण करावे, असे आवाहन सुमित कोल्हे यांनी शेवटी केले. सदर प्रसंगी थोरात यांनीही मनोगत व्यक्त केले. विजय भास्कर यांनी सुत्रसंचलन केले तर डी. के. कानडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डी. व्ही. तिवारी, एम.व्ही. मुरडनर व श्री नामदेव केदार यांनी विशेष परीश्रम घेतले.

Leave a Reply

You cannot copy content of this page