आता अध्यक्ष होणार मग निळवंडेचे पाणी शिर्डीला आणणार का ? विजय आढाव
Will he be the president now and will he bring Nilwande water to Shirdi? Vijay Aadhav
आठ दहा दिवसांआड पाणीपुरवठा ; भाजप सेना नगरसेवकांकडून मातीच्या घागरी फोडून जाहीर निषेध Water supply for eight to ten days; Public protest by BJP Sena corporators by breaking clay jars
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Mon 19July 17:00
कोपरगाव : साईबाबा संस्थान शिर्डी यांच्या कृपेने कोपरगावला येणाऱ्या निळवंडेच्या पाण्याला आपण विरोध केला. आता तुम्ही श्री साईबाबा संस्थान चे अध्यक्ष होणार मग निळवंडेचे पाणी शिर्डीला आणणार का ? असा जाहीर सवाल विजय आढाव यांनी आमदार आशुतोष काळे यांना केला. कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नावर तुम्ही निवडून आलांत आज दोन वर्ष झाले यासाठी आपण काय केले ? याचेही उत्तर कोपरगावच्या जनतेला द्यावे, असे आवाहनही आढाव यांनी यावेळी केले.
कोपरगाव शहराला आठ – दहा दिवसांआड पाणी देण्याच्या नगरपालिका निर्णयाचा सोमवारी सकाळी सेना-भाजप नगरसेवकांनी पालिकेच्या प्रांगणात नगराध्यक्ष विजय वहाडणे व आमदार आशुतोष काळे यांच्या नावाच्या घोषणा देत मातीच्या घागरी फोडून जाहीर निषेध केला,या आंदोलनात आढाव बोलत होते.
यावेळी पराग संधान म्हणाले, पाणी हा संपूर्ण शहराचा प्रश्न त्यामुळे पक्ष व राजकारण विरहित सर्वांनी एकत्र येऊन हा लढा लढायला हवा ! कोपरगावसाठी मला पाणी मिळवायचे आहे. मला यासाठी कोणाचेही नेतृत्व मान्य आहे. मला यात कुठलेही राजकारण आणायचे नाही. श्रेय त्यांनी घ्यावे आणि पाणी आणावे. आम्हाला घेऊन चला, नाही तर तुम्ही स्वतः जा, पण पाणी घेऊन या असे आवाहन युवा नेते विवेक कोल्हे यांनी काही महिन्यांपुर्वी केले होते. आजही ते त्यावर ठाम आहेत. आज पर्यंत कोपरगाव शहराच्या पाणी संकटात कोल्हे कुटुंबीय व संजीवनी यांनीच साथ दिली महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवण्यासाठी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी निळवंडे ची पाणी योजना आणली परंतु या काही विघ्नसंतोषी लोकांनी यात विघ्न आणले, बिपीनदादांनी ४२ कोटी ची योजना आणली सात कोटी देऊन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी जादाचा निधी दिला, परंतु आजतागायत ही योजना सुरू झाली नाही. आणि ती लोकार्पणही करण्यात आली नाही, केवळ कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नाचे भांडवल करून सत्ताधारी नगरसेवक म्हणून पाप आमच्या माथी मारण्याचे उद्योग सुरू असल्याची टीका संधान यांनी यावेळी केली. पाणी प्रश्नासाठी व्यापारी महासंघ काका कोयटे, राजेश मंटाला असो की संजय काळे या सर्वांना घेऊन कमिटी तयार करा त्या कमिटी निर्णयाला आम्ही पाठिंबा देऊ असे आश्वासन संधान यांनी शेवटी दिले,
सौ.ऐश्वर्या सातभाई म्हणाल्या, गेल्या महिन्याभरात पाणीप्रश्नावर नगराध्यक्ष यांनी आमचे नगरसेवक सभापती यांना विश्वासात घेतले नाही, आणि अचानक दहा दिवसांआड पाण्याची घोषणा केली त्यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे आज भाजपसेना नगरसेवकांवर आंदोलन करण्याची वेळ आली. असल्याची टीका त्यांनी केली.
कैलास जाधव म्हणाले, पाच नंबर साठवण तलावावर मते मागितली निवडून आल्यावर पावणे दोन वर्षात काय केले ? ४२ प्लस ७ ही ४९ कोटीची शहर पाणी योजना आजपर्यंत सुरु का झाली नाही ?, ती सुरू झाली असती तर कोपरगावकरांवर ही वेळच आली नसती, विशेष म्हणजे यामुळे वीज आणि पाणी दोन्हींची बचत झाली असती असा खुलासा त्यांनी केला .
जितेंद्र रणशुर म्हणाले, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या साक्षीने स्वच्छ पाणी व स्वच्छ कारभाराची शपथ घेतली परंतु साडेचार वर्षात फक्त भ्रष्टाचारच झाला या जागी दुसरा नगराध्यक्ष असता तर तुम्ही अत्यंत शेलक्या भाषेत त्याच्यावर टीका केली असती आता तुमच्यावर कोणत्या भाषेत टीका करायची याचे उत्तर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी द्यावे , ना. छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत गोदावरी कालवा समिती बैठक घेतल्याची पाठ थोपटून घेतली, मग आता आम्हाला पाणी नाही याचीही जबाबदारी घ्या असे आवाहनही त्यांनी आमदार आशुतोष काळे यांना केले.
यावेळी उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, गटनेते योगेश बागुल, शिल्पा रोहमारे, खलील कुरेशी यांची ही भाषणे झाली.
निषेध मोर्चात शहराध्यक्ष दत्ता काले, गटनेते रवींद्र पाठक, संजय सातभाई, राजेंद्र सोनवणे, महावीर दगडे, नगरसेवक सत्येन मुंदडा, ताराबाई जपे, दीपा गिरमे, मंगला आढाव, हर्षा कांबळे, विद्या सोनवणे, सुवर्णा सोनवणे, भारती वायखिंडे, शिवाजी खांडेकर, विनोद राक्षे, सुशांत खैरे, पिंटू नरोडे, पिंकी चोपडा, वैभव गिरमे, गोपीनाथ गायकवाड, विष्णूपंत गायकवाड आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.