कोपरगाव शहराच्या कुत्रिम पाणी टंचाईला कोल्हेच जबाबदार – सुनील गंगुले,
Kolhe is responsible for artificial water scarcity in Kopargaon city – Sunil Gangule,
सत्ताधारी विरोधकांचे आंदोलन नौटंकी The movement of the ruling opposition is a gimmick
कोपरगाव : मागील पाच वर्षात माजी आमदार कोल्हे यांनी सातत्याने पाच नंबर साठवण तलावाला विरोध केल्यामुळे आज कोपरगाव शहराला भेडसावत असणाऱ्या कुत्रिम पाणी टंचाईला कोल्हेच जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.सत्ताधारी विरोधकांचे आंदोलन म्हणजे नौटंकी अशी त्यांनी केली.
शहराच्या लोकसंख्येनुसार कोपरगाव शहराला पाणी आरक्षित आहे मात्र साठवण क्षमतेअभावी ते पाणी कोपरगाव नगरपरिषदेकडून उचलले जात नाही. पर्यायाने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते हि वस्तूस्थिती आहे. त्यासाठी साठवण क्षमता वाढविणे गरजेचे असल्यामुळे आमदार आशुतोष काळे मागील पाच वर्षापासून पाच नंबर साठवण तलावासाठी आग्रही होते. मात्र मागील पाच वर्षात माजी आमदार कोल्हे यांनी सातत्याने पाच नंबर साठवण तलावाला विरोधच केला. माजी आमदार अशोकराव काळे यांनी चार नंबर साठवण तलावाचे खोलीकरण करण्यासाठी दोन कोटी रुपये निधी मंजूर करून आणला होता. विरोधकांनी हे काम होवू दिले नाही. हे काम झाले असते तर आज परिस्थिती नक्कीच वेगळी असती. आमदार आशुतोष काळे यांनी सत्ता नसतांना देखील पाच नंबर साठवण तलावाच्या कामासाठी धरणे आंदोलन केले होते. त्यावेळी देखील कोल्हेंनी पाच नंबर साठवण तलावाला पडद्यामागून विरोध करण्यात धन्यता मानली. आमदार आशुतोष काळे यांनी निवडून येताच पाच नंबर साठवण तलावाचे काम मार्गी लावले. हेच काम माजी आमदार कोल्हे यांनी निवडून आल्यावर केले असते तर आज हि परिस्थिती शहरातील नागरिकांवर आली नसती. फक्त साठवण क्षमतेअभावी पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे याला सर्वस्वी कोल्हेच जबाबदार असून त्यांचे सत्ताधारी नगरसेवकांनी केलेले आंदोलन म्हणजे नौटंकी असल्याची टीका गंगुले यांनी पत्रकातून केली आहे.