धरणात पाण्याची आवक कमी; आपल्यावरील आरोप हास्यास्पद -वहाडणे

धरणात पाण्याची आवक कमी; आपल्यावरील आरोप हास्यास्पद -वहाडणे

Low water inflow into the dam; The allegations against you are ridiculous

 कोपरगाव : कोपरगावसाठी आवर्तन मिळावे यासाठी १ महिन्यापासून प्रयत्न सुरू आहेत.मागील महिन्यात जलसंपदा विभागाला लेखी पत्र पाठविण्यात आले,त्यानंतरही दोन वेळा स्मरण पत्र पाठविले.पण धरणक्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्याने धरणात पाण्याची आवक कमी आहे असे लेखी उत्तर कोपरगाव नगरपरिषदेला जलसंपदा विभागाकडून आले असल्याची माहिती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली, असून आपल्यावर केलेले आरोप हास्यास्पद असल्याची टीका त्यांनी केली.तरीही लवकरात लवकर आवर्तन मिळावे यासाठी प्रयत्न सुरूच आहेत.असेही ते म्हणाले,

मी दिल्लीतुन ना.नितीन गडकरी यांचे माध्यमातून समृद्धी महामार्गाच्या “गायत्री कंपनीला ५ नं.साठवण तलावासाठी खोदकाम सुरू करायला लावले. असा दावा वहाडणे यांनी पत्रकातून केला. आता आ.आशुतोष काळे यांच्या सहकार्याने ते खोदकाम पुन्हा सुरू झाले. सध्या काँक्रीटचा ५ नं. साठवण तलावाच्या तांत्रिक मान्यतेची प्रक्रिया सुरू आहे .असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे. सामाजिक कार्यकर्ते श्री.मंटाला यांनी सांगीतल्याप्रमाणे वितरण व्यवस्थेत दोष आहेतच.कारण पुर्वीच्या काही नगराध्यक्ष व नगरसेवकांनी सत्तेचा दुरुपयोग करून स्वतःच्या सोयीनुसार व्हॉल्व्ह बसवून घेतल्याने पाण्याचा अपव्यय होत असल्याचा आरोप त्यांनी केला. नगरपरिषद पाणी पुरवठा समितीही तुमच्याच ताब्यात, सौ.सुवर्णाताई सोनवणे याच सभापती, तुमचेच बहुमत. आरोप मात्र माझ्यावर. ४२ कोटींच्या पाणी योजनेतून कुणी किती ओरबाडले? हेही बाहेर येणारच आहे. स्वतःच्या प्रभागातील कामे मंजूर केले पण शहरातील मोक्याचे रस्ते होऊ नयेत यासाठी मे.उच्च न्यायालयातून स्थगिती कोणी आणली हे जनतेला कळते. महत्वाचे सण असतांनाही नागरिकांना पाणी टंचाईमुळे होत असणाऱ्या त्रासाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पाण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू आहेत, सहकार्य करावे अशी विनंती वहाडणे यांनी शेवटी केली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page