ग्रामीण भागाच्या विकासासाठी  दर्जेदार रस्ते हि काळाची गरज – आ. आशुतोष काळे

ग्रामीण भागाच्या विकासासाठी  दर्जेदार रस्ते हि काळाची गरज – आ. आशुतोष काळे

Quality roads are the need of the hour for rural development. MLA Ashutosh Kale

  कोपरगाव : दळणवळणाच्या साधनांसाठी रस्ते नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा  मुद्दा असून ग्रामीण भागाचा विकास साधायचा असेल तर दर्जेदार रस्ते असणे हि काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी कारवाडी येथे रा.मा. ७ ते  जिल्हा परिषद शाळा पर्यतच्या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमीपूजनप्रसंगी केले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते होते.

 आ. आशुतोष काळे म्हणाले की, मतदार संघात माजी आमदार अशोकराव काळे यांच्या कार्यकाळात रस्ते झाले. पण त्यानंतर हे रस्ते दुर्लक्षित राहिल्यामुळे आज अनेक रस्ते दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून अनेक रस्त्यांसाठी निधी मिळविला असून रस्त्यांची कामे सुरु आहेत. नागरिकांनी रस्त्याच्या बाजूने साईड गटार राहतील याची काळजी घ्यावी जेणेकरून रस्ता खराब होणार नाही यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.

यावेळी सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे,  कारखान्याचे संचालक सचिन चांदगुडे अशोक तिरसे, काकासाहेब ताम्हाणे, वसंतराव दंडवते, राहुल जगधने, सरपंच रुपाली माळी, उपसरपंच दिगंबर कोकाटे, भिकाजी सोनवणे,दिलीप पायमोडे, श्रीराम राजेभोसले, देवराम गावंड, अशोकराव मोरे, विक्रम कोकाटे, रोमेश बोरावके, नामदेव खुळे, प्रदीप जाधव, किसनराव सोनवणे, निरंजन बनकर, अनिल खरे, सचिन क्षिरसागर, अभियंता उत्तमराव पवार, राजेंद्र दिघे साहेब आदी उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page