गोदाम फोडून ७० हजाराच्या फॅन्सी बांगड्यांची चोरी;

गोदाम फोडून ७० हजाराच्या फॅन्सी बांगड्यांची चोरी;

70,000 fancy bangles stolen from warehouse;

विविध रंगांच्या ३०० बांगड्यांचे गठ्ठे  लंपासLampas with 300 bangles of different colors

दोन आरोपी सह ३३ हजार ४०० रूपये मुद्देमाल ताब्यात 33,400 with two accused

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Mon 19July 19:00

कोपरगाव : अज्ञात चोरट्यांनी कोपरगाव शहरातील कहारगल्ली येथील साईनाथ बँगलचे मालक गौरव सत्यनारायण अग्रवाल यांच्या बांगड्यांच्या गोदामाचे शटर तोडून गोदामामधील फॅन्सी नं १,२०० गठ्ठे , प्रति गठ्ठा २५० रूपये प्रमाणे ५० हजार रूपये,व फॅन्सी नं २,१,१०० गठ्ठे , प्रति गठ्ठा २०० रूपये प्रमाणे २० हजार रूपये,विविध रंगांच्या ३०० बांगड्यांचे गठ्ठे लंपास करून असे एकूण सुमारे ७० हजार रूपयांचा माल चोरून नेला. ही घटना २७ जुन रोजी उघडकीस आली. याप्रकरणी अग्रवाल यांनी कोपरगाव शहर पोलिसात तक्रार नोंदवली होती.

या प्रकरणी शहर पोलिसांनी गुप्त बातमीदाराच्या माहिती आधारे आरोपी आसिफ नुरखॉ सय्यद (३०) व मोसिन मुक्तार पठाण (२६) दोघेही रा. यशवंत चौकार गल्ली यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ते ३० व ५१ असे १८ हजार ४०० रुपये किमतीच्या बांगड्यांची गठ्ठे व गुन्ह्यात वापरलेली १५ हजार रुपये किमतीचे होंडा ॲक्टिव्हा ही दुचाकी असा ३३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस. सी. पवार करीत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page