आ.काळेंच्या हस्ते ना.म जलद कालवा प्रकल्पबाधितांना ६२ लाखाच्या धनादेशांचे वाटप

आ.काळेंच्या हस्ते ना.म जलद कालवा प्रकल्पबाधितांना ६२ लाखाच्या धनादेशांचे वाटप

MLA Kale distributes checks worth Rs 62 lakh to NAM fast canal project victims

उर्वरित प्रकल्पबाधितांना ८ कोटी ४० लाखाची भरपाई मिळवून देणार

8 crore 40 lakh will be provided to the remaining project affected people

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Tue 20July 18:00

कोपरगाव : तालुक्याच्या पूर्व भागातील प्रलंबित नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्याच्या वितरिका क्र.१ व २ च्या प्रकल्पबाधितांना ६१,८७,०००/- लाखाचे धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी खोपडीसह इतर गावातील प्रकल्पबाधितांना ८ कोटी ४० लाख रुपयांचा मोबदला मिळवून देणार असल्याची ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी दिली .

  विधानसभा निवडणुकीनंतर आमदार आशुतोष काळे यांनी नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्यासाठी शेतकऱ्यांच्या अधिग्रहीत केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्याच्या सर्व अधिकारी, भु-संपादन अधिकारी यांची संयुक्त बैठक घेवून येणाऱ्या अडचणी दूर केल्या. त्यामुळे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. विशेष म्हणजे आ. आशुतोष काळे यांनी समृद्धी महामार्गाप्रमाणे २०१३ च्या सुधारित जमीन अधिग्रहण कायद्यानुसार भरपाई मिळवून दिली आहे. अनेक वर्षापासूनचा प्रश्न सोडवून न्याय मिळवून दिल्याबद्दल प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. घोयेगाव, गोधेगाव, तळेगाव, लौकी, धोत्रे, खोपडी, भोजडे आदी गावातील उर्वरित बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असून शेतकऱ्यांनी आपले प्रस्ताव दाखल करावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.                   

यावेळी कारखान्याचे संचालक बाळासाहेब बारहाते, गोरक्षनाथ जामदार,  चारुदत्त सिनगर,शिवाजीराव शेळके,राजेंद्र खिलारी, दिगंबर जाधव,अजीनाथ खटकाळे, बबनराव भवर, रमेश खटकाळे, रामभाऊ खटकाळे, विजय भवर, अरुण कर्डक,रामदास खटकाळे, भाऊसाहेब गोडसे,  निवृत्तीराव भवर, नांदूर मध्यमेश्वर कालव्याचे बाळासाहेब वारकर, भूमी अभिलेख विभागाचे संजय भास्कर आदी उपस्थित होते.            

   चौकट :- अत्यंत कमी वेळेत आमचा प्रश्न मार्गी लावला आ.आशुतोष काळे यांच्या रूपाने आम्हाला पांडुरंग पावला असल्याच्या प्रतिक्रिया प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी दिल्या आहेत.          

Leave a Reply

You cannot copy content of this page