भा.मा. ठोळे इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी साजरी
Ashadi Ekadashi celebrated at B.M Thole English School
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Tue 20July 18:30
कोपरगाव : ऑनलाईन शिक्षणाच्या काळात विद्यार्थ्यांना महाराष्ट्र व भारतीय संस्कृतीचा विसर पडू नये यासाठी भागचंद माणिकचंद(भा.मा.) ठोळे इंग्लिश स्कूल मध्ये विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम पार पाडले जातात. याच माध्यमातून मंगळवारी (२०जुलै) रोजी सकाळी कोरोनाचे सर्व नियम पाळत आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी यांची पुजा केली, शिक्षकांनी भजने म्हटली व पालखी सोहळा आयोजित करून भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली,
यावेळी स्कूल ट्रस्टी कैलास ठोळे, चंद्रकांत ठोळे, दिलीप अजमेरे यांनी सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देऊन कोरोना संकटातून सर्वांची सुखरूप सुटका व्हावी यासाठी प्रार्थना केली. सोहळ्याचे सूत्रसंचालन सौ. अर्चना वाणी व सौ. निकिता पहाडे यांनी केले यावेळी सर्व शिक्षक उपस्थित होते.