कोपरगावात सव्वा पाच लाखांच्या तांब्याची तारेची चोरी,गुन्हा दाखल

कोपरगावात सव्वा पाच लाखांच्या तांब्याची तारेची चोरी,गुन्हा दाखल

In Kopargaon, theft of copper wire worth Rs 5 lakh

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Tue 20July 18:45

कोपरगाव : शहरातील स्टेशन रोड वरील साई तपोभूमी मंदिरामागील महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टच्या व्यापारी संकुलातील गाळा नं ११ श्रीराम मोटर्स या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून त्यातील सुमारे सव्वा पाच लाखांच्या तांब्याच्या तारेची चोरी झाल्याची तक्रार कोपरगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.

दुकानाचे मालक रामदास माधव राजुडे रा. नाटेगाव यांनी शहर पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी सकाळी एका ओळखीच्या इसमाचा फोन आला व त्याने तुमच्या गाळ्याचे शटर तोडून आत काही तरी गडबड झालेली दिसत असल्याचा दूरध्वनीवरून सांगितले. मी तातडीने दुकानाकडे धाव घेतली असता त्या ठिकाणी दुकानातून २,लाख ४०हजार रू किं.ची इंडक्शन कॉपर वायर चे ३० बॉक्स अंदाजे ३०० किलो वजनाचे प्रती किलो ८०० रू. प्रमाणे २ लाख ८० हजार रू. किं. चे समर्सिबल कॉपर वायर चे ३५ बॉक्स अंदाजे ३५० किलो वजनाचे प्रती किलो ८०० रू. प्रमाणे, ५ हजार रू. किं. चे सी आय लोखंडी बेंड २५ नग प्रती नग अंदाजे २०० रू प्रमाणे असा एकूण ५लाख २५ हजार रूपये किमतीची इलेक्टरीक मोटार भरण्याची तांब्याच्या धातूची तार अज्ञात चोरट्यानी चोरून नेलेली आढळून आल्याची फिर्याद दिली असून या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोसई भरत नागरे करीत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page