पिण्याच्या पाण्याचे साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून घ्या- आ. आशुतोष काळे

पिण्याच्या पाण्याचे साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून घ्या- आ. आशुतोष काळे

Fill the storage tank to its full capacity. MLA Ashutosh Kale

 गरज पडल्यास शेतीसाठी आवर्तनाची मागू Ask for rotation for farming if needed

कोपरगाव :  गुरुवारी (दि.२२) रोजी गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यांना पाणी सोडण्यात येणार आहे. या आवर्तनातून सर्व पाणी योजनांचे साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून घ्यावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे. तर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे शेतीला एक रब्बी व दोन उन्हाळी आवर्तनाचा दिली. असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोपरगाव तालुक्यात कमी असल्यामुळे कोपरगाव शहरासह अनेक गावात पाणी कपात केल्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. कालव्यावरील ग्रामपंचायतींनी पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन मिळावे अशी मागणी केली होती त्या मागणीची दखल घेवून पाटबंधारे विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांना पाणी योजनांचे साठवण तलाव भरण्यासाठी आवर्तन सोडण्याची मागणी केली होती.  त्या मागणीनुसार गुरुवारी (दि.२२) पासून गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यांना नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून चालू सिंचन वर्षातील पिण्याच्या पाण्याचे आवर्तन उजव्या कालव्यातून ३०० क्युसेस व डाव्या कालव्यातून २०० क्युसेसने पाणी सोडण्यात येणार असून नंतर पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात येणार आहे. लहरी पावसाचा भरवसा नाही त्यामुळे अजून पाऊस किती दिवस वाट पहायला लावणार हे सांगता येणार नाही. त्यामुळे पाणी पुरवठा साठवण तलाव पूर्ण क्षमतेने काळजीने भरून घ्यावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.  ओव्हर फ्लोतून सिंचनासाठी आवर्तन मागू

चौकट :- कोपरगाव तालुक्यात पुरेसा पाऊस न झाल्यास शेतीसाठी आवर्तनाची गरज भासल्यास ओव्हरफ्लो मधून शेतीसाठी आवर्तनाची मागणी जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांच्याकडे करणार आहे. – आ. आशुतोष काळे.          

Leave a Reply

You cannot copy content of this page