सरकारी कामात अडथळाप्रकरणी सात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल
Case filed against seven Shiv Sainiks for obstructing government work
पालिका उपमुख्याधिकारी यांची तक्रार
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Thu 22July 19:00
कोपरगाव : कर्तव्यावर असलेल्या नगरपालिका कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून सरकारी मालमत्ता नुकसान करून सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी उपमुख्याधिकारी यांच्या तक्रारीवरून सात शिवसैनिकांविरोधात गुरूवारी (२२जुलै) रोजी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिली.
अधिक माहिती अशी, की शहरातील पुनम थिएटर समोरील जागेत टाकण्यात आलेल्या दोन टप-या बुधवारी २१ जुलै रोजी प्रभारी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्या सुचने नुसार पालिकेचे उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे व बांधकाम अभियंता दिगंबर वाघ व त्यांचे कर्मचारी ते टपऱ्या काढण्यासाठी रात्री ९ ते ११ वाजेच्या दरम्यान गेले असता त्याठिकाणी बालाजी गोर्डे व त्यांचे सहकारी आले त्यांच्यात व अधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. गुरूवारी (२२जुलै) सकाळी ११ वाजता पालिका कार्यालयात अधिकाऱ्यांना अतिक्रमणात असलेल्या इतर टपर्या सोडून रात्री तातडीने आमच्याच टपऱ्या का काढल्या ? तक्रारी कोणी केल्या ते सांगा ? असा सवाल विचारण्यासाठी गेलेल्या शिवसैनिक व अधिकारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरु होती. आपल्या प्रश्नांची उत्तरे अधिकारी देत नाही यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी कार्यालयातील सामानाची मोडतोड केली, याबाबत पालिका उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये सात शिवसैनिकांविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करून मारहाण करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले असल्याची फिर्याद दाखल केली, असून सदर फिर्यादीवरून शिवसेना माजी शहरप्रमुख सनी रमेश वाघ, शिवसेना गटनेते नगरसेवक योगेश तुळशीदास बागुल, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नगरसेवक कैलास द्वारकानाथ जाधव, शिवसेना उपशहरप्रमुख बालाजी पंढरीनाथ गोर्डे, साई पंढरीनाथ गोर्डे, निलेश पंढरीनाथ गोर्डे व अशिष निळक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात केला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.





