थकबाकीदार वीज शेतक-यांचा विद्युत पुरवठा खंडीत करू नका : स्नेहलता कोल्हे

थकबाकीदार वीज शेतक-यांचा विद्युत पुरवठा खंडीत करू नका : स्नेहलता कोल्हे

Don’t cut off power supply to arrears farmers: Snehalta Kolhe

कोपरगाव : ‘कोरोना संसर्गामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यातच पावसाने ओढ दिली, खरीप पिके पाण्यावर आहेत तेव्हा सहकार्याची भूमिका घेत,वीज वितरण कंपनीने थकीत बिलांसाठी कुठलेही शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करू नये अन्यथा त्या विरुद्ध रस्त्यावर येऊन संघर्ष करावा लागेल असा इशारा भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.

सौ. स्नेहलता कोल्हे यांनी आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, यंदाच्या खरीप हंगामात पर्जन्यराजा कोपरगाववर काहीसा रूसलेला आहे. जुलै महिना संपत आला तरी पाऊस नाही, परिणामी नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात अडचण तयार झाली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विहिरीच्या पाण्याचा स्त्रोत आहे, त्यांनी कडवळ, हिरवा चारा पिके घेतली आहेत. काहीनीं अल्पशा पावसावर खरीप पिकांची पेरणी केली आहे, ती पिके आता पाण्यावर आली आहेत. मात्र थकित वीज बिलामुळे वितरण कंपनीने रोहित्र खंडित करण्याचा सपाटा लावला आहे. परिणामी शेतकऱ्यांची पंचायत झाली आहे. पाणी असूनही ते पिकांना वेळेवर देता येत नाही त्याबाबत असंख्य शेतकऱ्यांनी आपल्याकडे वीज प्रश्ननी लक्ष घालून पुरवठा सुरळीत करणे बाबत मागणी केली आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघातील या प्रश्नाबरोबरच उर्वरित विजेच्या समस्याबाबत आपण नाशिक येथील मुख्य अभियंता, संगमनेरचे कार्यकारी अभियंता व कोपरगाव उपअभियंता यांच्याशी प्रत्यक्ष बोलणी करून ह्या समस्या त्यांच्या कानी घातल्या आहेत. तेव्हा ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी या प्रश्नात लक्ष घालावे व कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील कुठल्याही वीज रोहित्रांचा पुरवठा खंडित न करणेबाबत संबंधितांना तात्काळ सूचना कराव्यात अन्यथा येथील नागरिक व शेतकरी रस्त्यावर उतरतील असेही शेवटी त्या म्हणाल्या.

Leave a Reply

You cannot copy content of this page