सहकार उद्यमी आयोजित मोफत शिवणकला प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ
Launch of Free Sewing Training Camp organized by Co-operative Entrepreneurs
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Thu 29July 21:00
कोपरगाव : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन संचलित सहकार उद्यमी आयोजित मोफत शिवणकला प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ S.S.K.वार्डरोबच्या संचालिका व प्रसिद्ध फॅशन डिझायनर सौ.सिमरन खुबाणी यांच्या शुभहस्ते समताच्या स्व.यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला. यावेळी प्रशिक्षक सौ.रिना जाधव, समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी सौ.सुहासिनी कोयटे म्हणाल्या कि,‘ महिला सबलीकरण समिती अध्यक्षा ॲड. सौ.अंजली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महिलांना रोजगार उपलब्ध करून त्यांना आजच्या धावपळीच्या युगात सक्षम बनविण्याचा प्रयत्न राज्यभर करण्यात येत असून महिलांना शिवणकला यांचे परिपूर्ण ज्ञान व्हावे यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहनही सौ. कोयटे यांनी यावेळी केले. फॅशन डिझायनींग चा अत्याधुनिक व्यवसाय करणार्या सौ सिमरन खुबाणी या कोपरगावसह महाराष्ट्रातील सर्व महिलांना आदर्श आहे. सौ.सिमरन खुबाणी म्हणाल्या कि,‘महिलांचे सक्षमीकरण होणे हि आज काळाची गरज बनली आहे. काळाची गरज ओळखून राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी अतिशय महत्वपूर्ण पाऊल उचलले असून त्यांच्या दूरदृष्टीकोनामुळे महिला बचत गटातील महिलांना निश्चितच फायदा होणार आहे. कोपरगाव तालुक्यात कोयटे परिवार सतत सामाजिक, शैक्षणिक, सहकारात सतत प्रयत्नशील राहून प्रशंसनीय कार्य करीत आहे. असे ही त्या म्हणाल्या, सौ.रिना जाधव म्हणाल्या कि,महिलांना सक्षमबनविण्यासाठी सहकार उद्यमी विविध उपक्रम व रोजगार उपलब्ध करून देत आहे. आम्ही महिला देखील शहराबरोबरच ग्रामीण भागातील प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या महिलांना घरोघरी जाऊन प्रशिक्षण देऊ. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार सौ.सुहासिनी कोयटे यांनी केला. सूत्रसंचालन व परिचय कु.रेणुका मुन्शी यांनी करून दिला. शिबीर यशस्वीतेसाठी सहकार उद्यमी कर्मचारी, समता महिला बचत गट महिला आदींनी विशेष परिश्रम घेतले.





