प्रबळ इच्छाशक्ती व आत्मविश्वासाने  कोरोनावर मात करणे शक्‍य- माजी मंत्री शंकरराव कोल्हे

प्रबळ इच्छाशक्ती व आत्मविश्वासाने  कोरोनावर मात करणे शक्‍य- माजी मंत्री शंकरराव कोल्हे

Corona can be overcome with strong will and confidence: Former Minister Shankarrao Kolhe

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Fri 30July 18:30

कोपरगाव : कोरोनाचा सामना करण्यासाठी त्याच्या बरोबर दोन हात करावेत लागणार आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनेचे पालन जर नागरिकांनी केले तर कोरोना दुर ठेवता येईल. माक्स, सँनीटायगर व सोशल डिस्टन ठेवणे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे.प्रबळ इच्छाशक्ती व आत्मविश्वास या जोरावर कोरोनावर मात करता येते. असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी चांदेकसारे येथे केले.

तीन महिन्याच्या संघर्षानंतर करोनावर मात करणाऱ्या संजय होन यांचा कोरोना योद्धा म्हणून सहकार महर्षी शंकरराव कोल्हे उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे, यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे संचालक अरुणराव येवले, अशोक औताडे आदींसह संचालक मंडळ उपस्थित होते. यावेळी बिपीन कोल्हे यांनी नागरिकांनी तिसऱ्या लाटेची दाट शक्यता असल्याने सावधानता बाळगावी‌ असे आवाहन केले. शेवटी आभार उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page