बंद पडलेले रोहित्र सुरू झाले, वेस सोयगावकरांनी  मानले स्नेहलता कोल्हेंचे आभार.

बंद पडलेले रोहित्र सुरू झाले, वेस सोयगावकरांनी  मानले स्नेहलता कोल्हेंचे आभार.

The closed Rohitra started, Wes Soygaonkar thanked Snehalta Kolhe.

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Tue 3 August 18:40

 कोपरगाव : तालुक्यातील वेस सोयगाव गावठाण हद्दीतील पंचवीस एम व्ही ए क्षमतेचे वीज रोहित्र चार महिन्यापासून बंद पडले होते, त्याच्या दुरुस्तीसाठी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी संगमनेर व उपविभाग राहता यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला त्याचा वीजपुरवठा सुरळीत होऊन पाणीपुरवठा व दलित वस्तीतील वितरण सुरळीत झाले त्याबद्दल सरपंच अशोक म्हाळसकर महाराज यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे आभार मानले आहे.

उपसरपंच रामदास भडांगे म्हणाले की, गेल्या चार महिन्यापासून परिसरातील वीज रोहित्र बंद होते, त्याची दुरुस्ती व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी संगमनेरचे कार्यकारी अभियंता व संबंधित विभागाचे अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला.   यातील अडचणी माजी आमदार स्नेहलता त्यांनी दूर केल्या.  त्यामुळे गावचा पिण्याच्य पाण्याचा पुरवठा व दलित वस्तीतील वीज पुरवठा सुरळीत झाला त्याबद्दल राजेंद्र कोल्हे यांच्यासह ग्रामस्थांनी स्नेहलता कोल्हे यांना धन्यवाद दिले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page