के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा

के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा

K. B. The tradition of excellent results of Rohmare Junior College

कोपरगाव :को.  ता. एज्युकेशन सोसायटी संचालित  येथील के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी २०२१ , १२ वी परीक्षेचा निकाल नुकताच इंटरनेट वर जाहीर झाला असून के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाने उज्ज्वल निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे. १२ वी विज्ञान, वाणिज्य व कला शाखेचा निकाल १०० % लागला आहे अशी माहिती प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी दिली.

१२ वी विज्ञान कु. अरगडे सायली संजय (९५.१७%)कु. बोधे सिद्धी अतुल ९४.१७%), रक्ताटे वैभव संजय (९३.६७%),१२ वी वाणिज्य वाव्हळ समाधान धर्मराज (९३.१७%), कु.काळवाघे वैष्णवी हर्षवर्धन( ९१.३३%), कु.सुरासे विभूती गोविंद.(९१.१७%),कु.जगताप प्रियंका महादेव (९१.१७%),१२ वी कला कु. साबणे दिव्या सुनील (९४.३३%), कु.पंडोरे गौरी प्रकाश (८६.००%) कु.उगले गायत्री संजय (८५.३३%) सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.श्री. अशोकराव रोहमारे, उपाध्यक्ष मा. श्री. रामदास पा. होन, सचिव  ॲड. संजीव कुलकर्णी, श्री. संदीप रोहमारे, संस्थेचे सर्व विश्वस्थ तसेच प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, कनिष्ठ महाविद्यालयाचे उप.प्राचार्य प्रा. सोनवणे बी. आर., अधीक्षक डॉ. अभिजित नाईकवाडे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाची प्रवेश प्रकिया ऑनलाइन पद्धतीने kjs.vriddhionline.com या वेबसाईट वर सुरु झाली असून महाविद्यालयाचे पुणे विद्यापीठाचे उत्कृष्ट करियर ओरिएंटेड अभ्यासक्रम बी.बी ए._सीए., बी. सी.एस., बी. एस. एस्सी. (सूक्ष्म जीवशास्त्र) इत्यादी चालू आहेत. प्रवेश क्षमता मर्यादित असल्यामुळे विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन त्वरित प्रवेश घ्यावा असे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी आवाहन केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page