सकल मराठा सोयरीक ग्रुपच्या महासंघटक पदी जनार्दन कदम

सकल मराठा सोयरीक ग्रुपच्या महासंघटक पदी जनार्दन कदम

Janardhan Kadam as the MahaSanghatak of Sakal Maratha Soyrik Group

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Thu 5 August 18:20

कोपरगाव: सकल मराठा सोयरीक ग्रुपची राज्यस्तरीय कार्यकारिणीत नगरसेवक जनार्दन कदम यांची महासंघटक पदी निवड झाल्याची माहिती सोयरीक ग्रुपचे समन्वयक जयकिसन वाघ यांनी दिली.

 नगरसेवक जनार्दन कदम यांनी कोपरगाव शहरात विविध ठिकाणी मराठा समाज शिबिरे, वधू वर मेळावे प्रभागातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कामे करीत असताना समाजाशी घट्ट नाळ जुळलेली आहे. त्यामुळे पुढील काळात विवाह जुळविणेकामी मोलाचे सहकार्य मिळणार आहे. राज्यस्तरीय कार्यकारिणीच्या अध्यक्षा माजी प्राचार्या सौ.रजनी गोंदकर, सौ.माया जगताप, बाळासाहेब भोर यांची उपाध्यक्ष म्हणुन सर्वानुमते निवड करण्यात आली. या सर्वांचे महाराष्ट्रातील मराठा समाज विविध संघटना कडून अभिनंदन केले जात असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page