महिला ग्रामसेवकाच्या सरकारी कामात अडथळा; एकाविरुद्ध गुन्हा दाखल,
Obstruction of government work of women gram sevaks; Filed a case against one,
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Thu 5 August 20:00
कोपरगाव : महिला ग्रामसेवकाच्या कामात अडथळा आणणाऱ्या घोयेगाव येथील एक जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली.
घोयेगाव ग्रामपंचायत महिला ग्रामसेवक सुवर्णा बबन वडीतके (३५)रा. खिर्डी गणेश यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी (४ जुलै) रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घोयेगाव ग्रामपंचायत मध्ये सरकारी काम करत असताना यातील आरोपी निखिल सुखदेव भाटे रा. घोयेगाव याने ग्रामपंचायत ऑफिस मध्ये येऊन माझे घरकुला बाबत जो निर्णय झाला तो मला मान्य नाही असे म्हणून जोरजोरात ओरडून अंगावर धावून येऊन टेबलावर हाताने जोरात मारून दहशत निर्माण करून सरकारी कामात अडथळा केला असल्याचे म्हटले आहे सदर फिर्यादीवरून आरोपी विरोधात गुन्हा नोंदविण्यात आलेला असून तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे पुढील तपास करीत आहे.





