मतदार संघातील कोरोना ग्रस्तांना उपचारासाठी दारोदार फिरण्याची पाळी – स्नेहलता कोल्हे.
Constituency Corona victims turn to the door for treatment – Snehalta Kolhe.
कारवाडी येथे २५ लाख रुपये खर्चाच्या विकास कामांचे लोकार्पण. Dedication of development works at a cost of Rs. 25 lakhs at Karwadi.
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Fir 6 August 20:00
कोपरगाव : गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडी शासनाने कोपरगावसाठी कुठलेही ठोस काम केले नसल्याने मतदार संघातील कोरोना ग्रस्तांना उपचारासाठी दारोदार फिरण्याची पाळी आली असल्याचा गंभीर आरोप भाजपा प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी कारवाडी येथे २५ लाखांचा कामाच्या लोकार्पण प्रसंगी केला.
सौ स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, एकीकडे विकासाच्या पोकळ बढाया मारायच्या आणि दुसरीकडे मतदार संघातील पाट पाणी, पिण्याच्या पाण्याच्या योजना, विविध योजनांचे रखडलेले अनुदाने, गोदावरी कालवे दुरुस्ती, समन्यायी पाण्याचे बोकांडी बसवलेले भूत, पीक विमा रस्ते, वीज, आरोग्य, पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या हातून खरीपाची वाया गेलेली पिके,कालव्या ऐवजी नदीला सोडलेले पाणी, आदि प्रश्न लोंबकळत ठेवले राज्यातील महाविकास आघाडी शासन म्हणजे एकमेकांचे रुसवे-फुगवे काढणारे शासन असून शेती शेतकरी आणि गोरगरिबांचे प्रश्नांना कुणी वाली राहिले नाही अशी घणाघाती टीका त्यांनी केली. शाळा खोल्या दुरुस्ती, गावासाठी शुद्ध आरो प्लांट, ग्रामपंचायत व अंगणवाडी साठी पेव्हर ब्लॉक, येडुआई सामाजिक सभागृह, विनायक पवार ते सांगळे वस्ती रस्ता कॉंक्रिटीकरण अशा सुमारे २५ लाख रुपये खर्चाच्या विकास कामांचे लोकार्पण स्नेहलता कोल्हे यांनी गुरुवारी(५ ऑगस्ट)रोजी केले. सरपंच रूपाली सागर माळी यांनी प्रास्ताविक केले. उपसरपंच दिगंबर कोकाटे यांनी सामाजिक सभागृह कामांचा आढावा देत संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी आजवर केलेल्या कामांची माहिती दिली. याप्रसंगी कोल्हे कारखान्याचे संचालक मनेष गाडे, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष संभाजीराव गावंड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोकराव आहेर, रामकृष्ण कोकाटे, चंद्रकांत चांदगुडे, विश्वास गाडे, माजी संचालक रघुनाथराव फटांगरे, केदार तनपुरे, हरीश कोकाटे, अनिता आढाव, शुभम वाकळे, शीला पवार, शंकरराव फटांगरे आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापक जी.एस. मंडलिक, के. एस. गायकवाड, प्रशांत खडतकर यांनी कारवाडी परिसरात कोवीड काळात कोरोना योद्ध्यांनी केलेल्या कामाचा गौरव करून योद्ध्यांना सौ स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक, सॅनिटायजर वाटप करण्यात आले. शेवटी उपसरपंच दिगंबर कोकाटे यांनी आभार मानले.





