पोहेगाव -अंतापुर तहराबाद पायी दिंडी प्रेरणा देणारी – स्नेहलता कोल्हे.
Pohegaon – Antapur Tahrabad Pai Dindi Inspiration – Snehalta Kolhe.
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Fir 6 August 9:00
कोपरगाव : संकटात मनुष्याला परमेश्वराची आठवण होते, परमेश्वराचा दुआ मिळाला की त्याचे जीवन सुखकर होते., पण स्वतःबरोबर समाजाचे भले व्हावे, कोरोना संकट दूर व्हावं ही प्रार्थना घेऊन पोहेगावचे माजी सरपंच रमेश औताडे व त्यांचे सहकारी गेल्या अनेक वर्षापासून पायी दिंडीने पोहेगाव ते अंतापुर तहाराबाद दावल मलिक देवस्थानला जात असतात ही बाब सर्वांना प्रेरणा देणारी आहे असे प्रतिपादन भाजपा प्रदेश सौ स्नेहलता कोल्हे यांनी दिंडीचे प्रस्थान प्रसंगी केले .
प्रारंभी पोहेगावचे माजी सरपंच रमेश औताडे म्हणाले की, मनुष्य भौतिक सुखात अधिक व्यग्र असुन त्याला परमेश्वराचा ध्यास तितकासा महत्त्वाचा वाटत नाही, आपली ही पायी दिंडी जनसामान्यांचे कल्याण होऊन मनुष्यावर येणारी प्रत्येक संकटे दूर व्हावी यासाठी आहे. माजी मंत्री शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन दादा कोल्हे, युवानेते विवेक कोल्हे यांच्यासह सर्व ज्ञात-अज्ञात सहकारी बांधवांचे सतत सहकार्य असते याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला. मोरविसचे माजी सरपंच गोरख कोकाटे यांनी आभार मानले.