आत्मा मालिक गुरुकुलाच्या’ सात विद्यार्थ्यांची नवोदयासाठी निवड

आत्मा मालिक गुरुकुलाच्या’ सात विद्यार्थ्यांची नवोदयासाठी निवड राज्यातील पहिली घटना कोपरगांव जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत एकाच शाळेतील सर्वाधिक सात विद्यार्थीची नवोदय विद्यालयासाठी निवड होणे ही राज्यातील पहिली घटना असून हा मान आत्मा मालिक गुरुकुल ला मिळाला असल्याची माहिती विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट चे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी दिली. केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय व केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ नवी दिल्ली आयोजित जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाच्या आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलाच्या भाग्यश्री सोनवणे, दिक्षा गावित, दुर्गेष चव्हाण, करण चौधरी, गौरव पाटील, निखील गायकवाड, तन्मय इंगळे या 7 विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. यावेळी प्राचार्य निरंजन डांगे यांनी सांगितले की, जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्याना केंद्र सरकार मार्फत सी.बी.एस.ई. अभ्यासक्रमाचे इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंतचे वसतीगृहयुक्त शिक्षण मोफत दिले जाते. आजपर्यंत आत्मा मालिक माध्यमिक गुरुकुलाच्या 68 विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. यावर्षी संपूर्ण राज्यात एका शाळेचे सर्वाधिक विद्यार्थी निवडले जाण्याचा मान आत्मा मालिकने मिळविला आहे. या विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख सागर अहिरे, सचिन डांगे, पर्यवेक्षक अनिल सोनवणे, विशय षिक्षक दिपक चौधरी, कोमल जगताप, प्रियंका चौधरी यांचे मागदर्षन लाभले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प.पू. आत्मा मालिक माऊलीच्या आशिर्वादासह, ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रभाकर जमधडे, प्रकाश भट, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे, माधवराव देशमुख, व्यवस्थापक हिरामण कोल्हे, सर्व विभाग प्रमुख, पर्यवेक्षक, शिक्षकवृंद आदिनी अभिनंदन केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page