पोलीसांच्या कामात अडथळा; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल, दोघांना अटक, दोन फरार
Obstruction of police work; Charges filed against four persons, two arrested, two absconding
दोन दिवस पोलीस कोठडीTwo days police custody
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Sat 7 August 20:00
कोपरगाव : पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणणाऱ्या कोपरगाव येथील चार जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी दोन आरोपीस पोलीसांनी अटक केली आहे, तर दोन जण फरार झाले आहेत अटक केलेल्या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अशी माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी दिली.
पोलीस कर्मचारी सहाय्यक फौजदार बबन नाथा साठे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी सहा ऑगस्ट रोजी रात्री ११.२५ च्या सुमारास पोलीस कर्मचारी दंडात्मक कारवाई करत असताना स्वास्तीक हॉटेल जेऊर कुंभारी ता. कोपरगाव येथे आनंद भारतसिंग परदेशी (३०) रा. निवारा, कोपरगाव,सुनिल बाळासाहेब पांडे (२८) रा. बेट, कोपरगाव, पट्या उर्फ विजय लक्ष्ण इस्ते व आकाश रंगनाथ लोखंडे दोन्ही रा. तिनचारी, कोकमठाण या चार आरोपी यांना शांत करण्याचे शासकीय काम करत असताना यातील आरोपी यांनी मोठमाठ्याने आरडाओरडा करुन त्यांचे शासकीय कामात अडथळा निर्माण करुन मा. जिल्हाधीकारी सो. अहमदनगर यांचे कार्यालयाकडील क्र. डी.सी./कार्या९ब१/१५०५/२०२१ अहमदनगर दि.२६ जून २०२१ च्या आदेशाचे उल्लंघन केलेले आहे. वगैरे म।। चे फिर्यादीवरुन कोपरगाव शहर पोस्टे गु. रजि. नं व कलम २४८/२०२१ भादवि कलम ३५३,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे तर दोन जण फरार आहेत. अटक केलेल्या आनंद भारतसिंग परदेशी, व सुनिल बाळासाहेब पांडे या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती तपासी अधिकारी पो.स.ई. भरत नागरे यांनी दिली.