भाजपाच्या कुरेशी ने राष्ट्रवादीच्या कुरेशीला सुनावले

भाजपाच्या कुरेशीने राष्ट्रवादीच्या कुरेशीला सुनावले

BJP’s Qureshi told NCP’s Qureshi

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Sun 8 August 19:20

कोपरगाव : भाजपचे उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नवाज कुरेशी एकेकाळी कोल्हे यांचे कार्यकर्ते होते , मात्र ते तर आता ‘राष्ट्रवादीच्या हातातले बोलके बाहुले’ बनले’ असल्याची मिश्किल टिका  अरिफ कुरेशी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या चौकातील मारामारीच्या भाषेमुळे त्यांची जनमानसात झालेली कोंडी व शहराच्या पाणी प्रश्नावर आ. आशुतोष काळें यांनी केलेली फसवणूक उघड झाल्या मुळेच विरोधक बेतालपणाची वक्तव्य करीत आहे. संस्कारांचीच तुलना करायची असल्यास असे एक नाही अनेक व्हिडिओ तुमच्या पदाधिकाऱ्यांचे जनतेसमोर ठेवता येऊ शकतात व त्या कृत्याच्या पाठीमागे तुमचे नेतेच आहेत का ? असा सवाल अरिफ कुरेशी यांनी केला.

नेत्यांचे संस्कार संस्कृती काढण्यापर्यंत मजल जाणारे नवाज कुरेशी यांना कोल्हेच्या संस्कृतीचा विसर पडलेला दिसतो. विवेक कोल्हे यांच्या धडाकेबाज कामाच्या जोरामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकल्याने राष्ट्रवादी कार्यकर्ते आकांड तांडव करून स्वतःची पाठ स्व:तचं थोपटून घेत असल्याचे टीकास्त्र सोडले,तर राष्ट्रवादीची गत आपले ठेवावे झाकून आणि दुसऱ्यांचे पहावे वाकून अशी झाली असल्याची खिल्ली त्यांनी उडवली.

कुणाच्या पक्षाचे व नेत्यांचे काय हीन पातळीचे संस्कार आहे, हे नागरिकांना चांगले कळलेले आहे. अशा घटनांचे संदर्भ आ. काळेंच्या संस्काराशी जोडून बोलता येऊ शकते मात्र कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या गोष्टीचा संबंध राजकीय दृष्टीने जोडणे कोल्हे कुटूंब करत नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोणी काय केले हे सर्वांना सांगितले, तर तुमचे पदही तुमचे नेते ठेवणार नाहीत. तेंव्हा कोपरगाव राष्ट्रवादीचा लाव रे तो व्हिडिओ म्हणायची वेळ येवू देऊ नका, असा इशारा आरिफ कुरेशी यांनी पत्रकातून शेवटी दिला.

Leave a Reply

You cannot copy content of this page