के.जे.सोमैया  महाविद्यालयात यू.पी.एस.सी. मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

के.जे.सोमैया  महाविद्यालयात यू.पी.एस.सी. मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

UPSC in KJ Somaiya College Guidance program completed

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Mon 9 August 16:25

कोपरगाव : स्पर्धा परीक्षेसाठी पदवी स्तरावरील गुणवत्तेबरोबरच स्वतःची आंतरिक प्रेरणा अधिक महत्त्वाची असते केवळ कुणीतरी सांगितलं म्हणून स्पर्धा परीक्षेची तयारी करू नये, तसेच कला व वाणिज्य विज्ञान या शाखेतील विद्यार्थ्यांनी अगदी बारावी पासून यूपीएससीची तयारी करावी” असे प्रतिपादन नगर उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी यूपीएससी मार्गदर्शनपर ऑनलाइन व्याख्यानसत्रात केले .

Photo Caption के.जे.सोमैया महाविद्यालयात यू.पी.एस.सी. मार्गदर्शन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सिद्धार्थ भंडारे, उपजिल्हाधिकारी अहमदनगर जिल्हा व आय.ए.एस. विशाल नरवडे जिल्हाधिकारी सांगली

भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिकचे संचालक डॉ. मालोजी भोसले भंडारे पुढे म्हणाले की “स्पर्धा परीक्षांच्या तयारीमध्ये स्मार्टफोन हा अत्यंत वेगाने मागे खेचणारा मोठा सायलेंट किलर आहे त्याचबरोबर मित्रपरिवार कुटुंब व आई-वडील यांची सकारात्मक भूमिका विद्यार्थ्यांना लवकर यशोशिखरावर नेते. सांगली येथील जिल्हाधिकारी  विशाल नरवाडे (आय.ए.एस.2020 बॅच) म्हणाले की “”विद्यार्थ्यांनी स्वतःच्या चुका सुधारून स्पर्धा परीक्षेची तयारी करावी व स्वतःचा उत्तम असा बी प्लॅन सुद्धा तयार ठेवावा यूपीएससी चा अभ्यास करु इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी शक्यतो आत्मविश्वास वाढवणार्‍या शाखेतूनच पदवीचे शिक्षण घ्यावे. त्याचबरोबर इंग्रजी भाषेचा अधिक बाऊ न करता कमपुरती इंग्रजी शिकुन देखिल यशस्वी होता येते हे समजून घ्यावे.” यावेळी डॉ. मालोजी भोसले यांनी  महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महाविद्यालयीन युवक स्पर्धा परीक्षांमध्ये उतरला तरच ग्रामीण भागातील युवकांचा यूपीएससी परीक्षांमध्ये व पर्यायाने सनदी सेवेत सहभाग वाढेल व महाराष्ट्राचे नाव अग्रभागी येईल,अशी आंतरिक तळमळ व्यक्त केली.                          

भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक महाराष्ट्र शासन व के.जे.सोमैया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले या व्याख्यानात संपूर्ण महाराष्ट्रातून सव्वा तीनशे हून अधिक उमेदवार उपस्थित होते. या कार्यक्रमात   सहभागी झाली होती. संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय,  एस. एस. जी. एम. महाविद्यालय , सौ. सुशिलामाई काळे महाविद्यालय, , संजीवनी फार्मसी महाविद्यालय,, श्री साईबाबा महाविद्यालय , साई निर्माण महाविद्यालय , महिला महाविद्यालय , कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय  या महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा  प्राधान्याने  सहभाग होता.या सर्व महाविद्यालयांचे समन्वयक महाविद्यालय म्हणून के.जे. सोमैया वरिष्ठ व के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाने काम पहिले.                           या ऑनलाइन व्याख्यान सत्रासाठी कोपरगाव तालुका एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.अशोक रोहमारे, सचिव ॲड. मा.संजीव कुलकर्णी व  संदीप रोहमारे यांनी शुभेच्छा दिल्या.

या व्याख्यानच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या प्रास्तविक प्रा. विजय ठाणगे यांनी स्वागत व प्रा. डॉ. वसुदेव साळुंके यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन अधीक्षक डॉ अभिजीत नाईकवाडे, प्रा. रवींद्र जाधव आदींचे सहकारी लाभले.  

Leave a Reply

You cannot copy content of this page