अडचणीच्या काळात भारतीय डाक जीवन विमा योजना  फायद्याची – विजय कोल्हे.

अडचणीच्या काळात भारतीय डाक जीवन विमा योजना  फायद्याची – विजय कोल्हे.

Beneficial Indian Postal Life Insurance Scheme in times of crisis – Vijay Kolhe.

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Mon 9 August 16:35

कोपरगाव : तालुक्यातील दहेगाव येथे भारतीय डाक विभागाच्यावतीने ग्रामीण डाक जीवन विमा पॉलिसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना सारख्या महामारीच्या काळात अनेक कुटुंबांतील कर्त्या पुरुषiचा मृत्यू झाला पण त्यांनी ग्रामीण डाक जीवन विमा पॉलिसी घेतल्या होत्या त्यांच्या वारसांना आठच दिवसांत पॉलिसीचे क्लेम मंजूर करून पीडितांच्या घरच्यांचे अश्रू पुसण्याचे काम केले आहे असे प्रतिपादन श्रीरामपूर पोस्ट विभागाचे अधिकारी विजय कोल्हे यांनी केले. प्रत्येक १८ ते ५५  वयोगटातील स्त्री पुरुषांनी पोष्टाची  विमा पॉलिसी घ्यावी असेही ते म्हणाले.

                   दहेगावचे शहीद जवान वल्ट्टे यांच्या स्मारकास सेवानिवृत्त मेजर विनायक शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.अध्यक्ष स्थानी सरपंच रवींद्र देशमुख होते या प्रसंगी सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष  त्र्यंबकराव सरोदे, सोसायटीचे अध्यक्ष्य लक्ष्मण वल्ट्टे, माजी पोस्ट मास्तर सुरेश जोशी, आबासाहेब वरकड, दत्ता सिनगर, राजेंद्र पगारे, बंडू उघडे, रखमा काकडे, कारभारी खडांगळे, बाळकृष्ण उघडे, डाक आवेक्षक अर्जुन मोरे, संजय ढेपले, किशोर दिघे, संवत्सरचे पोस्ट मास्तर दत्तात्रय गायकवाड, जीवन पवाडे, राहुल आढाव आदी उपस्थित होते. 
             विजय  कोल्हे पुढे  म्हणाले की, पोस्टातील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित आहे.   सुकन्या समृद्धी सारखी योजना आल्यामुळे आपल्या देशात मुलींच्या जन्माचे  कुणीही ओझे समजत नाहीत , पोष्टiचे  नियम हे रेल्वेच्या रुळ सारखे सरळ आहेत,  आपण गुंतवणूक केलेला एक रुपया हा आपल्यालाच मिळतो म्हणून ग्रामीण भागात आजही पोष्ट खात्यावर शंभर टक्के विश्वास आहे. पोष्टातील विविध योजनांची उपस्थितांना  माहिती देण्यात आली. सेवानिवृत्त सुरेश जोशी यांना एक वडाचे रोपटे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. 

Leave a Reply

You cannot copy content of this page