गोदावरी कालव्याला तातडीने खरीपाचे आवर्तन सोडा- नितिन औताडे

गोदावरी कालव्याला तातडीने खरीपाचे आवर्तन सोडा- नितिन औताडे

Release kharif cycle to Godavari canal immediately- Nitin Autade

जलसंपदा मंत्री जयंत पाटील व नाशिक पाटबंधारे विभागाकडे मागणी Demand to Water Resources Minister Jayant Patil and Nashik Irrigation Department

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Mon 9 August 16:55

कोपरगाव : गेल्या दोन महिन्यापासून कोपरगाव तालुक्यात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात घेतलेली पिके कोमाजुन गेली आहे. शेतीला पाणी मिळाले तरच ही पिके आता जगतील. पिण्याच्या पाण्याच्या चालू आवर्तनातून खरीपाच्या पिकांना पाणी देणे गरजेचे होते मात्र अचानक पाटबंधारे विभागाने कालवा बंद करत शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला. शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी जळून चालली आहे तेव्हा गोदावरी कालव्यांना तातडीने खरीपाचे आवर्तन सोडा अशी मागणी नितीन औताडे यांनी केली आहे.

धरण पाणलोट क्षेत्रात घोटी इगतपुरी त्र्यंबकेश्वर भागात पर्जन्यमान चांगले झाल्याने गोदावरी नदीला वाहत आहे. दारणा गंगापूर धरणे ७५ टक्के भरलेली आहेत. कोपरगाव राहाता तालुका अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडतो. त्यामुळे ब्रिटिशांनी या भागाला पाणी मिळण्यासाठी या धरणांची निर्मिती करून गोदावरी कालव्याद्वारे पाणी आणले मात्र २००५ साली समन्यायी पाणी वाटप कायदा झाला आणि नगर नाशिक जिल्ह्याचे हक्काचे पाणी मराठवाड्याकडे वर्ग करण्यात आले. शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित असलेला गोदावरी कालव्याचा पाणीप्रश्नावर लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला पाहिजे. धरणात पाणी असून देखील कालव्यांना पाणी न सोडता गोदावरीला विसर्ग करावा लागतो ही अडचण केवळ या कायद्यामुळे झाली आहे.शेतकऱ्याने पदरमोड करत, दागिने गहाण ठेवत, कर्ज काढून खरिपाची पिके घेतले आहे. सोयाबीन, मका ,कपाशी, भाजीपाला फळबागा पाऊस नसल्याने पाण्याअभावी जळून चालल्या आहेत. सातत्याने शेतकऱ्यांच्या वतीने गोदावरी कालव्यांना आवर्तन सोडण्याची मागणी होत आहे. मात्र समन्यायी पाणी वाटप कायदाच्या नावाखाली जायकवाडीला पाणी वाहून जात आहे. गोदावरी कालव्याला अवघ्या दिड टिमसी पाण्याची गरज असताना पाटबंधारे विभागाकडून कालवे सुटले जात नाही ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. नांदूर-मधमेश्वर 65 टक्के भरल्याशिवाय पाणी अडवायचे नाही ही समन्यायी पाणी वाटप कायद्याची अट शिथिल करून जगा आणि जगू द्या असे धोरण प्रशासनाने घेतले पाहिजे. खरिपामध्ये शेतकऱ्याना पाणी मिळण्यासाठी तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी या कायद्यात सुधारणा करण्यासाठी आवाज उठवला पाहिजे असे निवेदनात म्हणत शेतकऱ्यांचा अंत न पाहता गोदावरी कालव्यांना तातडीने खरीपाचे आवर्तन सोडावे अशी मागणी नितिनराव औताडे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील व नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे…

Leave a Reply

You cannot copy content of this page