दृढ निश्चयाने दिव्यांग बांधव उत्कृष्ट कामगिरी करू शकतात. – आ. आशुतोष काळे
Divyang brothers can do a great job with determination. – Come on. Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Mon 9 August 17:55
कोपरगाव : दिव्यांग असल्याचे मनातून काढून टाका,जे काम हाती घेतले आहे त्या कामावर विलक्षण निष्ठा ठेवा,मनाचा दृढ निश्चयाने काम केल्यास दिव्यांग बांधव सर्वसामान्य व्यक्तीपेक्षाही उत्कृष्ट कामगिरी निश्चितपणे करू शकतात. असा विश्वास आ. आशुतोष काळे यांनी सोमवारी सकाळी कृष्णाई मंगल कार्यालयात दिव्यांग बंधू-भगिनींना वैश्विक कार्ड वितरण प्रसंगी व्यक्त केला.
निसर्गाने प्रत्येक मानवाला सर्वच गुण बहाल केलेले नसतात. प्रत्येकामध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीची उणीव हि नक्की असते.कोणत्याही एका गोष्टीची उणीव आपल्याला यश मिळविण्यापासून दूर नेऊ शकत नाही. एक बाजू कमकुवत जरी असली तरी त्याची भरपाई करण्यासाठी निसर्गाने एक गुण जास्त बहाल केलेला असतो याची खात्री बाळगा. त्यामुळे आपण दिव्यांग असल्याचा न्यूनगंड न बाळगता आपण आपली आंतरिक शक्ती ओळखा,असा सल्ला त्यांनी दिला. दिव्यांग बांधवांना दैनंदिन जीवनात कोणत्या अडचणी येतात याची मला जाणीव असून या अडचणी सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगत कोपरगाव मध्ये दिव्यांग भवन बांधण्याचा मानस आ. आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.
यावेळी पंचायत समिती सभापती सौ.पोर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, केएसके उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, बाळासाहेब बारहाते, गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, धरमचंद बागरेचा, सौ.सोनाली साबळे, श्रावण आसने, मधुकर टेके, अनिल कदम, रोहिदास होन, नगरसेवक मंदार पहाडे, हाजीमेहमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे, सुनील शिलेदार, संदीप रोहमारे, फकीर कुरेशी, रमेश गवळी, परमेश्वर कराळे,नारायण गुरसळ, भास्करराव डुकरे,पप्पू वीर, पंडितराव वाघिरे आदी मान्यवर उपस्थित होते.