आमदार काळे यांच्या उपस्थितीत घारीच्या ३० कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

आमदार काळे यांच्या उपस्थितीत घारीच्या ३० कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

30 Ghari activists join NCP in the presence of MLA Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Mon 9 August 18:05

कोपरगाव : मतदार  संघातील नागरिकांची कुटुंबातील सदस्याप्रमाणे काळजी घेणारा आमदार अशी आशुतोष काळे यांची प्रतिमा संपूर्ण मतदार संघात तयार झाली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होवून कोपरगाव तालुक्यातील घारी येथील विरोधी पक्षाचे लक्ष्मण पवार व ज्ञानेश्वर पवार यांच्यासह ३० कार्यकर्त्यांनी घारी आमदार काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

 घारी येथे रस्ता खडीकरण , रस्ते काँक्रिटीकरण,  जिल्हा परिषद शाळेस तार कंपाउंड, गावठाण दलित वस्ती रस्ता, आर.ओ. प्लॅन्ट शेड उभारणी, पाईपलाईन करणे, जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती , समाजमंदिर दुरुस्ती या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आ. आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी कार्यकर्ते म्हणाले, आ आशुतोष काळे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत रस्ते, वीज, पाणी प्रश्न मार्गी लावले, कोट्यावधी निधी आणला . जीवघेण्या कोरोना संकटात खासगी हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये खर्च येत असतांना आ. काळे यांनी तातडीने केलेल्या उपाय योजनांमुळे सर्वसामान्य कुटुंबातील बाधित रुग्णांचा उपचार घेता आले. निस्वार्थी लोकप्रतिनिधी या त्यांच्या कार्याने प्रभावित होवून आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याचे सांगितले.                 

 यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे, केएसके कारखाना उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,  आनंदराव चव्हाण, पंचायत समिती सदस्य सौ.अनुसया होन, राहुल रोहमारे, रोहिदास होन, केशवराव जावळे,  गायकवाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.            

Leave a Reply

You cannot copy content of this page