खुनी मुलगा पकडला , बापाची हत्या करून झाला होता फरार

खुनी मुलगा पकडला , बापाची हत्या करून झाला होता फरार

The murderer’s son was caught, the father had been killed and had absconded

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lTue10 August 14:05

कोपरगाव : बापाची हत्या करून फरार झालेल्या मुलाला कोपरगाव तालुका पोलिसांनी राहत्या घराच्या मागील उसातून अटक केली आहे. आरोपी हा गेल्या तीन वर्षापासून मोक्का गुन्ह्यात फरार होता अशी माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली.

भागवत भारम भोसले (५५) अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. भागवत हा मूळचा कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथे राहणारा आहे. विहिरीवरील पाईपलाईनचे झाकण उघडण्यास का गेले ? या करणावरून भागवत व त्याच्या दोन मुलांनी २० जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता त्याच्या डोक्याचे कुऱ्हाड घालून गंभीर जखमी केले होते कारसबाई भारम भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भागवत भारम भोसले, कृष्णा भागवत भोसले जिगर भागवत भोसले रा. पढेगाव या तीन आरोपीविरोधात कलम ३०७, जीवे मारण्याचा प्रयत्न गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो फरार झाला होता.
साईबाबा हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असताना ५ ऑगस्ट गुरुवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान कोपरगाव तालुका पोलीसांनी ३०२ वाढीव कलम लावले होते. 

फरार असलेला खुनातील आरोपी राहते घरामागील उसात लपून बसलेला असल्याची माहिती मिळाली, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी व क्यूआरटी कमांडो पथकाने भागवत भोसले याला अटक केली. सदर आरोपी भागवत भोसले याच्यावर कोपरगाव शहर व तालुका पोलीस स्टेशनमध्ये खून, फसवणूक व जीवे मारण्याचा प्रयत्न असे अनेक गुन्हे दाखल आहेत.

कोपरगाव तालुका पोलिसांनी ही धाडसी कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव , साईबाबा मंदिर सुरक्षा शिर्डी क्यूआरटी कमांडो, सपोनि भरत नागरे ,सपोनि सुरेश आव्हाड, पोहेकॉ इरफान शेख, सायबर पोलीस पो. ना. फुरखान शेख, पो. कॉ. अनिस शेख, पो. कॉ. अशोक काळे, पो. कॉ. अंबादास वाघ, पो. कॉ. जयदिप गवारे यासह अधिकारी व अंमलदार यांनी कारवाई केली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page