संजीवनी ज्युनिअर काॅलेजचा निकाल १०० टक्के
100% result of Sanjeevani Junior college
शृष्टी शेलार(९६. ८३%)वाणिज्य शाखेत तालुक्यात प्रथम,Shrishti Shelar (96.83%) first in the taluka in Commerce branch
समर्थ कुलकर्णी (९६ %) विज्ञान शाखेत Samarth Kulkarni (96%) first in science
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lTue10 August 14:25
कोपरगांव: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकत्याच जाहिर केलेल्या इ. १२ वी च्या निकालात संजीवनी ज्युनिअर काॅलेजचा निकाल १०० टक्के लागला असुन स्थापनेनासुन सलग १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यात वाणिज्य शाखेच्या शृष्टी विलासराव शेलार हिने ९६. ८३ टक्के गुण मिळवुन वाणिज्य शाखेत कोपरगांव तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवुन संजीवनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे, तसेच समर्थ कुलकर्णी याने ९६ टक्के गुण मिळवुन विज्ञान शाखेत प्रथम आला, अशी माहिती संजीवनी ज्युनिअर काॅलेजने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात दिली आहे.
इ. १२ वी परीक्षेच्या महत्वाच्या वळणावर संजीवनी ज्युनिअर काॅलेजमध्ये वाणिज्य विभागाच्या शृष्टी विलासराव शेलार हिने शेकडा ९६. ८३ टक्के गुण मिळवुन संपुर्ण कोपरगांव तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. याच विभागात ऋषिकेश संतोश जाधवने व श्रध्दा नयन पाटील यांनी अनुक्रमे ९५. १७ व९५ टक्के गुण मिळवुन दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. विज्ञान शाखेत समर्थ राजेंद्र कुलकर्णी याने ९६ टक्के गुण मिळवुन संजीवनी मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण होण्याचा बहुमान मिळविला. ऋषिकेश शरद गाडेकर याने ९५. १७ व उज्वल राजेंद्र बोडखे याने ९४ टक्के गुण मिळवुन संजीवनीच्या विज्ञान शाखेत अनुक्रमे दुसरा व तिसरा गुणानुक्रमांक मिळविला. वाणिज्य विभागात १८ तर विज्ञान विभागात १३ अशा ३१ विद्यार्थ्यांनी ९० टक्यांपेक्षा अधिक गुण मिळविले.
संजीवनी ज्युनिअर काॅलेजचा एकही विद्यार्थी खाजगी शिकवणीला जात नाही. इ. १२ वी नंतरच्या सर्व प्रवेश परीक्षांची तयारी काॅलेजमध्येच करून घेतल्या जात असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनात संभ्रम निर्माण होत नाही, हे संजीवनीचे वैशिष्ट्य आहे. याच बरोबरोबर शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच बहुआयामी विद्यार्थी घडविण्यासाठी काॅलेज मार्फत सर्वोतोपरी सर्व प्रयत्न केले जातात, असे पत्रकात शेवटी म्हटले आहे.
विद्यार्थ्यांच्या १०० टक्के निकालाबाबतच नव्हे तर प्रत्येक विद्यार्थ्याला चांगले गुण मिळाल्याबध्दल माजी मंत्री व संजीवनी ग्रुपइन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांचे भाग्यवान पालक तसेच प्राचार्य डाॅ. आर.एस. शेंडगे व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.