चांदेकसारे बाल भैरवनाथ जोगेश्वरी मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी उचलून नेली
Thieves took away the donation box from Chandeksare Bal Bhairavnath Jogeshwari temple
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lTue10 August 19:25
कोपरगाव :तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या चांदेकसारे येथील बाल भैरवनाथ व माता जोगेश्वरी मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी रात्री उचलून नेली. सध्या मंदिर ट्रस्ट कडून कोरोना परिस्थिती असल्यामुळे मंदिर बंद आहे. याचाच फायदा या चोरट्यांनी घेत नवीन बसवलेली दानपेटी उचलून नेली .
सकाळी देवपूजा साठी आलेल्या पुजा-याच्या घडलेला प्रकार लक्षात आला. त्यांनी तात्काळ माहिती ग्रामस्थांना दिली. घडलेली घटना अतिशय गंभीर असल्याने माजी सरपंच केशवराव होन, संचालक आनंदराव चव्हाण ,काशिनाथ होन, शंकरराव चव्हाण, किरण होन, गणेश होन, राहुल होन, कांतीलाल होन मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष मधुकर होन,सचिन होन, सुधाकर होन, रवींद्र होन ,सागर होन, नितीन होन, राहूल होन, सतीश चव्हाण अदी ग्रामस्थांनी मंदिराकडे धाव घेतली.चोरट्याने लाबवलेल्या दानपेटी चा अंदाज घेत पन्नास ते साठ हजार रुपयांची रोकड या पेटीत असावी असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. चोरट्यांनी रात्री मंदिराच्या मेन गेटचे कुलप तोडत थेट मंदिरात प्रवेश करत ही दानपेटी उचलून नेली.सदर घटनेची माहिती माजी सरपंच केशवराव होन यांनी कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना दिली असता श्वान पथकही घटनास्थळी दाखल झाले. काही ठिकाणी माग काढत त्यांनी घडलेल्या परिस्थितीचा पंचनामा केला. श्री राम रतन पंचायतन आश्रम ट्रस्ट पती ने कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक जाधव यांनी दिली.