आ. काळेंमुळे राष्ट्रीय महामार्ग १६० वर शासकीय जागेवरील ४९ वंचितांना मोबदला मिळणार
Come on. Due to the blackout, 49 deprived people on government land on National Highway 160 will get compensation
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lTue10 August 19:30
कोपरगाव : तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग १६० जात असून या महामार्गामुळे प्रकल्पबाधित शासकीय जागेवर वास्तव्यास व उद्योग व्यवसाय सुरु होते त्या जागा सबंधितांच्या नावावर नसल्यामुळे त्या देर्डे कोऱ्हाळे येथील ४२ व चांदेकसारे येथील ७ अशा ४९ नागरिकांना शासनाकडून भरपाई मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्याबाबत आ.आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, प्रातांधिकारी गोविंद शिंदे, एन.एच.१६०चे प्रोजेक्ट डायरेक्टर साळुंके यांच्याकडे पाठपुरावा केल्याने लवकरच नुकसानीचे मुल्यांकन होवून या प्रकल्पबाधित नागरिकांना मोबदला मिळणार आहे. त्याची माहिती आमदार काळे यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली.
आ. काळे यांनी त्याबाबत जिल्हाधिकारी, प्रांतधिकारी, प्रकल्पाधिकारी यांच्यासोबत अनेक बैठका घेवून हा प्रश्न लावून धरला होता. त्याबाबत शासनाने एक पाऊल मागे घेत शासकीय जागेवर वास्तव्यास असणाऱ्या ज्या नागरिकांचे घर, व्यवसाय बाधित झाले आहेत. त्या नागरिकांच्या होणाऱ्या नुकसानीचा आढावा घेवून त्याचे मुल्यांकन करण्यात येईल व त्याप्रमाणात या नागरिकांना भरपाई देण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी गोविद शिंदे यांनी शासनाच्या वतीने आ.आशुतोष काळे यांना सांगितले आहे. नागरिकांना भरपाई मिळणार असल्यामुळे या नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून या नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. या बैठकीत प्रातांधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, अभियंता प्रशांत वाकचौरे, केएसके कारखान्याचे व्हा. चेअरमन सुधाकर रोहोम, संचालक सचिन रोहमारे, देर्डेचे सरपंच योगीराज देशमुख,सुधाकर होन, कृष्णा शिलेदार, केशव विघे आदि उपस्थित होते.