सुरेगावमधून १४ वर्षीय मुलीला पळविले

सुरेगावमधून १४ वर्षीय मुलीला पळविले

A 14-year-old girl was abducted from Suregaon

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lTue10 August 20:00

 कोपरगाव : तालुक्यातील सुरेगाव मोती नगर मधील एका १४ वर्षीय मुलीला आरोपीने अज्ञात कारणाकरीता फिर्यादीचे कायदेशीर रखवालीतून पळून नेल्याप्रकरणी एका  विरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी फिर्यादीने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.९ ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास मोतीनगर सुरेगाव ता. कोपरगाव येथून गणेश चिघा पवार रा. मिलिंद नगर जामखेड याने अज्ञात कारणाकरीता फिर्यादीचे कायदेशीर रखवालीतून पळून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेची भांदवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. एस. एन. भताने हे तपास करीत आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page