नगर-मनमाड (रामा १०) महामार्गावरील, खड्डे बुजवा; – आ. आशुतोष काळे

नगर-मनमाड (रामा १०) महामार्गावरील, खड्डे बुजवा; – आ. आशुतोष काळे

जागतिक बँक अधिकारी बैठक

वृत्तवेध ऑनलाइन , न्युज नेटवर्क

एरिया – टाकळी फाटा ते पुणतांबा फाटा

कोपरगाव : नगर मनमाड महामार्गावर येथील टाकळी फाटा ते पुणतांबा
फाट्यापर्यंत मोठ-मोठे खड्डे पडलेले आहे. त्यामुळे येथुन प्रवास करणे अत्यंत हालाखीचे झालेले आहे. सदर परिसरामध्ये अपघाती उंचवटे असल्याने रस्त्यावरील खड्यांचा अंदाज येत नसल्याने चालकांची तारंबळ उडत आहे. लहान मोठे अपघात होण्याचे प्रमाण वाढल्याने तातडीने या रस्त्यावरील खड्डे बुजवावे, असे आदेश आमदार आशुतोष काळे यांनी जागतिक बँकेचे अभियंता राजगुरू यांना या विषयावर झालेल्या बैठकीत दिले आहे.

 

या  महामार्गावर गाडी चालविताना तारंबळ उडत आहे.सदरील खड्यांमधुन वाहने आपटतात. त्यामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच सततच्या पावसामुळे खड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले आहे. त्यामुळे खड्यांचा आंदाज येत नाही. त्यामुळे बऱ्याच वाहनांचे नुकसान सहन करावे लागलेले आहे. परिसरातील रस्त्याची खड्डे पडुन रस्त्याची झालेली चाळण यामुळे प्रवाशी मेटाकुटीला आलेले आहे.शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत धरून हा राज्यमार्ग ओलांडून जावा लागतो.त्यामुळे वारंवार होणारी हि येवला नाका, साई तपोभुमी चौक, बेटनाका या वर्दळीच्या ठिकाणी विद्यालये, महाविद्यालय, रेल्वे स्टेशन रोड यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काय उपाय योजना करता येतील, याचा देखील आढावा घेण्याच्या सूचना आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी दिल्या .

जागतिक बँकेचे कार्यकारी अभियंता राजगुरू यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत नगर-मनमाड राज्यमार्गावर कोपरगाव परिसरात रस्त्याची पाहणी करून खड्डे तातडीने बुजवून देवू असे अभियंता राजगुरू यांनी आमदार आशुतोष काळे यांना सागितले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page