पुणतांबा पाणी योजनेतील निकृष्ट दर्जा व त्रुटी खपवून घेणार नाही -स्नेहलता कोल्हे

पुणतांबा पाणी योजनेतील निकृष्ट दर्जा व त्रुटी खपवून घेणार नाही -स्नेहलता कोल्हे

Punatamba will not tolerate poor quality and defects in water scheme – Snehalta Kolhe

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lThu12 August 20:40

 कोपरगाव : पुणतांबा आणि परिसरासाठी महत्वाच्या असलेल्या १७ कोटीच्या पाणी योजनेच्या निकृष्ट कामाबद्दल अनेक तक्रारी आले आहे याबाबत संबंधित प्रशासनाला सूचना देण्यात आल्या असून निकृष्ट काम कामामुळे निकृष्ट व कामातील त्रुटी खपवून घेतला जाणार नाही असा इशारा भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी दिला.

सौ. कोल्हे यांच्या अथक प्रयत्नांतून मंजूर झालेल्या योजनेचे दोन वर्षांपूर्वी काम सुरू करण्यात आले असून साठवण तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने दोनदा पिंचीग खचल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे अनेक तक्रारीनंतर सौ कोल्हे यांनी आज साठवण तलाव कामाची प्रत्यक्ष पाहणी केली कामाचा दर्जा बाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी दुरध्वनीवरुन संपर्क साधला व कामाचा दर्जा चांगला राहील यासाठी प्रयत्न केला पाहिजे अशा सूचना दिल्या. संपूर्ण राज्यात सर्वप्रथम पुणतांबा व रामपुरवाडी पाणी योजनेसाठी शेती महामंडळाची जमीन मिळवून दिली ही ऐतिहासिक बाब असुन पुढच्या पिढ्यासाठी पाणी योजना फायदेशीर ठरणार असुन व मोठा निधी एकदाच मिळत असल्याने या कामात हयगय खपवून घेतली जाणार नाही व संबंधित यंत्रणेने पुणतांबेकराच्या जीवाशी खेळ खेळु नये असा इशारा कोल्हे यांनी यावेळी दिला. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, माजी सरपंच सर्जेराव जाधव, सुधाकर जाधव, दादासाहेब सांबारे, संभाजी गमे, किसन बोरबने, बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते. चौकट अनेक निवडणुकीत गाजलेला प्रश्न अनेक पंचवार्षिक निवडणुकीत पुंनतांब्याचा पाणी प्रश्न केवळ प्रचाराचा मुद्दा ठरला, मात्र तो सुटला नाही. सुदैवाने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आदींनी ही योजना मार्गी लावत त्यासाठी १७ कोटी रुपयांचा संपूर्ण निधी देऊन महिलांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडविल्याने मोठे समाधान असल्याचे सौ कोल्हे यांनी सांगितले. 

Leave a Reply

You cannot copy content of this page