ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. रंगनाथनांनी वाचन संस्कृती रुजविण्याचे कार्य केले- प्रा. डॉ. जोशी
The father of library science, Dr. Ranganathan worked to inculcate a reading culture – Prof. Dr. Joshi
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lThu12 August 20:50
कोपरगाव : सुसुंस्कृत आणि सभ्य समाजाच्या निर्मीतीसाठी औपचारिक शिक्षणाबरोबरच निरंतर वाचन आवश्यक असते, याचसाठी ग्रंथालय शास्त्राचा विकास झाला. देशात व एकूणच जगात सर्वसामान्यांसाठी ज्ञानाची कवाडे विनामूल्य खुली करून वाचन संस्कृती रुजविण्याचे कार्य ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस.आर.रंगनाथन यांनी केले म्हणूनच त्यांचा जन्मदिवस ‘ग्रंथालय दिन’ म्हणून साजरी केला जातो. असे प्रतिपादन प्रा. डॉ. पी.जी.जोशी यांनी सोमैया रोहमारे महाविद्यालयात ‘ग्रंथालय-दिनी’ केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.बी.एस यादव हे होते.
प्रा. जोशी पुढे म्हणाले की, आपल्या महाविद्यालयाचे ग्रंथालय एक भव्य आणि समृद्ध ग्रंथालय आहे.” येथे हजारो ग्रंथ आणि मासिकांबरोबरच अनेक ई-ग्रंथ व ई-जर्नल्स उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग विद्यार्थी व संशोधकांनी करून घ्यावा. माजी कार्यालय अधीक्षक श्री. संभाजी नाईक म्हणाले महत्वाचा ग्रंथ घरपोच मिळाला तर आमचा आनंद आणखी वाढेल. ग्रंथपाल नीता शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हाट्सअँप ग्रुप सुरु केला त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.”
प्राचार्य डॉ. बी. एस. यादव म्हणाले की, आजचा ग्रंथालय दिन व ज्येष्ठ नागरिकांची वार्षिक सभा हा असाच एक उपक्रम आहे. या निमित्ताने आम्ही ज्येष्ट नागरिकांसाठी एक व्हाट्सअँप ग्रुप सुरु करून त्यामाध्यमातून विविध विषयांचे उत्तम ग्रंथ डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो आहोत. भविष्यात देखील असाच प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.”
या कार्यक्रमास प्रा.डॉ टी.आर.पाटील, डॉ.निर्मला कुलकर्णी, श्री.विलास नाईक, श्री. शरद घाटे, श्री. अशोकराव आढाव, श्री. बी.आर.शिंदे, श्री. सुभाष बनकर आदी ज्येष्ट नागरिक तसेच प्राध्यापक वृंद व कर्मचारी वर्ग सामाजिक अंतराचे पालन करून उपस्थित होता. प्रास्ताविक प्रा.निता शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालय विभागाचे बाळासाहेब पानगव्हाणे, श्री. स्वप्निल आंबरे, श्री. रवींद्र रोहमारे व अविनाश शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.