गौतम पोलिटेकनिक च्या विद्यार्थ्यांची बजाज ऑटो मध्ये निवड 

गौतम पोलिटेकनिक च्या विद्यार्थ्यांची बजाज ऑटो मध्ये निवड

Selection of Gautam Polytechnic students in Bajaj Auto

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lThu12 August 21:00

कोपरगाव :  कर्मवीर शंकरराव काळे एजुकेशन सोसायटीच्या गौतम पॉलिटेक्निक इंस्टीट्युट च्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांची बजाज ऑटो लिमिटेड या कंपनी मध्ये नोकरीसाठी निवड झाल्याची प्राचार्य प्रा.सुभाष भारती व प्लेसमेंट अधिकारी प्रा.राम कोकाटे यांनी दिली.

महाविद्यालयाचा निकाल १०० % आहे. इंजिनीअर झाल्यानंतर महाविद्यालयाच्या प्रयत्नातून या विद्यार्थ्यांचे नोकरीचे देखील स्वप्न पूर्ण होत आहे. त्यामुळे गौतम पॉलिटेक्निक इंस्टीट्युट मध्ये प्रवेश घेवून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी शासकीय नोकरीत  तसेच बहुसंख्य नामांकित कंपन्यांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहे . कु.आरती शिवाजी चिने, कु.कामिनी सोमनाथ गावंडे, कु.प्राजक्ता अशोक जोरे, कु.स्नेहल दीपक राजगुरू,यश शशिकांत पोळ,वैभव पुंजाहारी नवले ,मंगेश गोपीनाथ गायकवाड,अभिषेक भाऊसाहेब आदिक यांची नुकतीच बजाज ऑटो लिमिटेड कंपनी पुणे मध्ये निवड झालेली आहे. या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन मा. माजी आमदार अशोक काळे, विश्वस्त आ. आशुतोष काळे, व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड मानद सचिव सौ.चैताली काळे तसेच सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.  

Leave a Reply

You cannot copy content of this page